छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील टिकरापारा पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध कथावाचकाला विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आले. याबाबत माहिती मिळताच महिलेच्या पतीनं घटनास्थळी धाव घेत पत्नीला रंगेहाथ पकडलं. तसेच कथावाचकाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रेवा येथील प्रसिद्ध कथाकार भास्कराचार्य हे त्यांच्या विवाहित मैत्रिणीला भेटण्यासाठी रायपूरला आले होते. कथावाचक मध्यप्रदेशातील अनेक भागात धार्मिक प्रवचने देतात. गेल्या काही महिन्यांपासून कथावाचक महिलेच्या संपर्कात होते. याच काळात दोघांमधील जवळीक वाढली. तिला भेटण्यासाठी तो रायपूरला आला. चारचाकीमध्ये दोघेही शारीरिक संबंध ठेवत होते. लैंगिक संबंध ठेवताना दोघांना स्थानिक नागरिकांनी रंगेहाथ पकडलं. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीनं घटनास्थळी धाव घेतली.
दोघांना कारमधून बाहेर काढत स्थानिक रहिवाशांनीही त्याला बेदम चोप दिला. या घटनेदरम्यान, कथावाचकाची शेंडी कापण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच टिकरापाड पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली कथावाचकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कुणाला अटक करण्यात आली नाही. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक रहिवासी कथावाचक भास्करचार्य यांच्या वर्तनावर प्रचंड नाराज आहेत.