खळबळजनक :
खळबळजनक : "या" रेल्वे ट्रॅकवर आढळले तिघांचे मृतदेह ; नेमकं काय घडलं ?
img
Dipali Ghadwaje
पालघर : मुंबईजवळ पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर तीन मृतदेह सापडले आहेत. पालघरच्या हनुमान मंदिर चौक येथील बंद फाटकाजवळ तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. भरधाव ट्रेनने चौघांना उडवल्याची प्राथमिक माहिती आहे. यातल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जयपूर एक्स्प्रेसने या चौघांना चिरडलं आहे. या घटनेनंतर आरपीएफ आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तर अपघातामध्ये जखमी झालेल्या एकावर पालघरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालघरच्या हनुमान मंदिर चौक येथे रेल्वेचं फाटक आहे. सिग्नल लागल्यानंतर हे फाटक बंद झालं नव्हतं का? की   हे चौघं रेल्वे फाटक ओलांडून गेले आणि त्यांना रात्रीच्या अंधारात ट्रेन आलेली दिसली नाही का? याचा तपास पोलीस करत आहेत.
crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group