नाशिक : ग्रामसभेतच राडा ! गावच्या सरपंचासह दहा जणांना अटक
नाशिक : ग्रामसभेतच राडा ! गावच्या सरपंचासह दहा जणांना अटक
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : नाशिकमध्ये तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोवर्धन गावातील मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गावात दोन दिवसांपूर्वी ग्रामसभा बोलविण्यात आली होती. मात्र, यावेळी क्षुल्लक कारणावरून सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यात वाद झाला आणि यांच्यावर थेट हाणामारीच सुरु झाली. 

नेमकं काय घडलं ?
गोवर्धन हे नाशिकमध्ये तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारे गाव आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील बिरसा मुंडा सभागृहात ग्रामसभा बोलविण्यात आली होती. सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही ग्रामसभा बोलविण्यात आली होती. यावेळी व्हिडिओ शूटिंग काढण्यावरून सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यात वाद झाला आला. वाद टोकाला गेला आणि मग याचे रूपांतर हाणामारीत झाले. हानामारी दोघांपर्यंतच मर्यादित न राहता दोन्ही बाजूंच्या गटांमधील महिला-पुरुषांमध्येही हाणामारी सुरु झाली आणि याच हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

हे ही वाचा...  

घटनेची माहिती मिळताच पेठ 3 विभागाचे पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर याठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं. या घटनेप्रकरणी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्षासह दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय ? 
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरपंच गोविंद दत्तू डंबाळे हे सभेच्या ठिकाणी बसलेले होते. यावेळी संशयित आरोपी किशोर पिराजी जाधव, शंकर पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल जाधव, शंकर ढवळे, सुनील जाधव व त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिलांनी कुरापत काढून ग्रामसभेत मारहाण करण्याचा कट रचत लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी साक्षीदार महिलेच्या अंगावरील कपडे फाटले. सार्वजनिक ठिकाणी लज्जास्पद कृत्य केल्याचे  म्हटले आहे.

हे ही वाचा...  
हृदयद्रावक ! बैल धुण्यासाठी शिक्षकाची नजर चुकवून गेला अन बैल धुताना...

पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष असलेल्या संशयित किशोर जाधव यांच्या तक्रारीनुसार सरपंच गोविंद डंबाळे, विशाल जाधव, पोपट डंबाळे, हरी डंबाळे, हेमंत डंबाळे, फकिरा डंबाळे, सोमनाथ सननाईक, अक्षय डंबाळे, दिनेश पाटील यांच्यासह काही महिलांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तसेच जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांवरून गुन्हा दाखल झाला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group