नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, वर्षभराची पाण्याची चिंता मिटली
नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, वर्षभराची पाण्याची चिंता मिटली
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे ९४ टक्के भरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात चांगला पाऊस होत आहे, तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यानं धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करूनही धरणात पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहे. 

आजचे राशीभविष्य २२ ऑगस्ट २०२५ , आजचा वार शुक्रवार ; खर्च की संपत्तीतून फायदा…; तुमच्या राशीत आज काय खास? वाचा

गंगापूर धरण समूहाचा पाणीसाठा देखील ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर जिल्ह्यातील २६ लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा देखील ८८ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील २६ पैकी ११ धरणं १०० टक्के भरली. त्यामुळे नाशिककरांना वर्षभर पाणी टंचाई पासून मुक्ती मिळणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group