स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहे. दरम्यान , राज्यात पक्षातऱ्याच्या वाऱ्यानेही वेग धरल्याचे दिसून येत आहे. सोमवारी नाशिक तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांचे जातनिहाय आरक्षण सोमवारी जाहीर झाले. मात्र यात खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची मात्र निराशा झालीय. कारण तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गटांपैकी ३ गट राखीव आहे.

एकलहरे हा गट अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून गिरणारे, गोवर्धन हे २ गट आदिवासींसाठी राखीव झाला आहे. गोवर्धन गट हा सलग दुसऱ्यांदा आदिवासींसाठी राखीव झाला. यावेळी महिलेला संधी मिळणार आहे. केवळ पळसे गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामप्र) साठी राखीव झाला आहे.
पंचायत समितीच्या ८ गणातील सय्यदपिंप्री, लहवित हे दोन्ही खुले झाले आहेत. पळसे आणि विल्होळी (महिला) गण नामप्रसाठी राखीव झाले असून, एकलहरे गण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाला आहे. विशेष म्हणजे गिरणारे, देवगांव हे दोन्ही गण अनुसुचीत जमाती महिलेसाठी तर गोवर्धन गण अनुसूचित जमातीसाठी खुला झाला आहे.