नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : तरुणीला दारू पाजून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करून त्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणी ही गंगापूर परिसरात राहते. आरोपी विजय देवकाते (वय 20) याने पीडितेला तिच्या राहत्या घरातून अॅक्टिव्हा मोपेडवर बळजबरीने बसवून त्र्यंबक रोडवरील एका लॉजमध्ये नेले. तेथे नेल्यावर आरोपी देवकाते याने पीडितेहला दारू पाजून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. तेव्हा त्याने फिर्यादीसोबतचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून धमकी दिली.
“तू हा प्रकार कोणाला सांगितलास, तर तुझे सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करीन,” असे सांगितले. त्यानंतर आरोपी विवेकने पीडितेचे हे फोटो व व्हिडिओ सुमित नावाच्या मुलाला पाठवून ते पीडितेला दाखवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.
हा प्रकार दि. 7 नोव्हेंबर रोजी त्र्यंबक रोडवरील एका लॉजमध्ये घडला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विवेक देवकाते व सुमित (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन करीत आहेत.