नाशिकच्या येवल्यात रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याने उसा खाली दबून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे
या दुर्घटनेत आनंदा मुरलीधर काकड यांच्यासह सखाराम भीलाला या मजुराचा जागीच मृत्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी नरसिंग गणसिंग भिलाला असे नाव समोर आले आहे. ट्रॉलीच्या बेरिंग मध्ये बिघाड झाल्याने जॅक लावून बेरिंग बदलण्याचं काम सुरू असताना जॅक निसटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान घटनास्थळी मुखेड येथील शिवसेनेचे नेते छगन आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन तातडीने ऊस बाजूला केला मात्र त्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. एकाची प्रकृती चिंताजनक असून जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आलं आहे.