नाशिकमध्ये मविआला खिंडार ! उदय सांगळेसह 'हा' माजी आमदार भाजपच्या वाटेवर
नाशिकमध्ये मविआला खिंडार ! उदय सांगळेसह 'हा' माजी आमदार भाजपच्या वाटेवर
img
वैष्णवी सांगळे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी संपूर्ण राज्यात पक्ष बदलाचे वारे वाहत आहे. नाशिकमध्येही पक्षबदलाला जोर असताना नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडणार आहे. 



नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे हे पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये जाणार आहे.  सांगळे हे ३ नोव्हेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दिंडोरीमध्ये देखील मविआला मोठा धक्का बसणार आहे. 



माजी आमदार रामदार चारोस्कर पत्निसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  माजी आमदार रामदास चारोस्कर आणि माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची पक्ष प्रवेशाची तारीख देखील ठरली आहे. येत्या ३ नोव्हेंबरला ते भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना यामध्ये १ लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. या निवडणुकीत उदय सांगेळ यांनी महायुतीचे उमेदवार मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजप स्वबळावर लढेल अशी चर्चा सुरू आहे.
nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group