अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नजन यांची आत्महत्या
अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नजन यांची आत्महत्या
img
Prashant Nirantar
 नवीन नाशिक  (प्रतिनिधी) :- अंबड पोलीस ठाण्यात  पोलीस निरीक्षक अशोक नजन (वय 40) यांनी आज पोलीस ठाण्यात स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.


नझन हे काल रात्री शिवजयंतीचा बंदोबस्त करुन उशीरा घरी पोहोचले. आज सकाळी नेहमीप्रमाणे 9.30 वाजेच्या सुमारास ते पोलीस ठाण्यात आले. त्यांच्या केबिनमध्ये त्यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. 


हजेरी मास्टर आज त्यांच्या केबिनमध्ये गेले असता ही घटना त्यांना समजली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे कारण समजूू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी पोलीस ठाण्यात भेट दिली. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group