अडीच महिन्यात अभयची ६७ कोटीची वसुली, ३ लाख ६० हजार थकबाकीदारांचा प्रतिसाद
अडीच महिन्यात अभयची ६७ कोटीची वसुली, ३ लाख ६० हजार थकबाकीदारांचा प्रतिसाद
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी): नाशिक महानगर पालिकेकडून अभय योजनेद्वारे वर्षानुवर्षाची थकबाकीची वसुली करण्यासाठी करदात्यांना सवलत देत आहे. याद्वारे थकबाकीवर तब्बल ९५ टक्के सवलत देऊन जास्तीत जास्त थकबाकी वसुलीच्या प्रयत्नात आहे.



सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर सलग तीन महिन्यात शास्तीवर ९५ टक्के सूट दिली आहे. या अडीच महिन्यात काल पर्यत ३ लाख ६० हजार २८५ करदात्यांनी ६७ कोटी ८१ लाख ११ हजार २५६ रुपयांचा भरणा केला आहे.

शहरात सहा लाखहून अधिक घरपट्टीची नोंद नाशिक महानगर पालिकेच्या कर विभागात आहे. यातील काही थकबाकीदारांकडे तब्बल साडे तीनशे कोटीची थकबकीचा फुगवटा झाला आहे. शास्तीच्या रक्कमेमुळे दरवर्षी थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. यंदा कर विभागाला तीनशे कोटी वसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे चालू घरपट्टी आकरण्याबरोबरच मागील थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान कर विभागासमोर आहे. 

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेला पंचवीस टक्के हिस्सा तयार करुन ठेवयचा आहे. साधारणत: ही रक्कम हजार कोटीच्य पुढे आतपार्यत मनपाने सातशे ते आठशे कोटीपर्यतची रक्कम जुळ्वली आहे. परंतु उर्वरीत रक्कमेची जमवाजमव करण्यासाठी कर विभागाला जास्तीत-जास्त शास्तीची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहेत. त्यानुसार कर विभागाकडून गेल्या काही दिवसांत नोटीसा दिल्या जात आहेत.
nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group