पोलिसांनी काल सायंकाळी रोहिदास नगर येथे अवैध कुंटनखान्यावर छापा टाकला. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बनावट ग्राहक पाठवून सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रोहिदास नगर येथे ६० वर्षीय हिराबाई बबन चव्हाण ही महिला घरीच अवैधरित्या कुंटनखाना चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी २७ वर्षीय पीडितेची सुटका केली असून, तिच्याकडून आर्थिक फायद्यासाठी अनैतिक व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी हिराबाई चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेला सुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट नाशिक ग्रामीणचे हवालदार बाळकृष्ण पजई यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करत आहेत.