नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नेमिचंद ललिताप्रसाद पोद्दार (वय 75) यांचे रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर अपोला रुग्णालयात उपचार सुरु होते. अग्रवाल सभेचे ते माजी अध्यक्ष होते. नंदीनी गो शाळेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गायी सांभाळल्या.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी सव्वाअकरा वाजता पाटील लेन नं. 3 मधील त्यांच्या निवासस्थानापासून द्वारका अमरधाम येथे काढण्यात येणार आहे. पोद्दार परिवाराच्या दु:खात भ्रमर परिवार सहभागी आहे.