नाशिककरांनो मुलांकडे जरा लक्ष द्या ! विद्यार्थ्यांच्या बॅगेत पुस्तकांऐवजी निघाल्या 'या' वस्तू ,  पोलिसांनाही बसला धक्का
नाशिककरांनो मुलांकडे जरा लक्ष द्या ! विद्यार्थ्यांच्या बॅगेत पुस्तकांऐवजी निघाल्या 'या' वस्तू , पोलिसांनाही बसला धक्का
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमध्ये भाईगिरी वाढलीय. जो उठेल तो सोशल मीडियावर रील बनवून , धमक्या देऊन भाई बनायला पाहतोय. याचे परिणाम लक्षात न घेता अल्पवयीन मुले सुद्धा मोठ्या संख्येने गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले आहे. पोलिसांनी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळच्या उड्डाणपुलाखाली संशयित दोन विद्यार्थ्यांच्या पाठीवरील 'बॅग'ची तपासणी केली. यात त्यांना धक्कादायक वस्तू सापडल्या आहे. 


बँड बाजा वाजवत जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा, कारण काय ? वाचा

शिक्षण घेण्याच्या वयात मुलांच्या दप्तरमध्ये चॉपर, कोयता सापडलाय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. दुसऱ्या विधीसंघर्षित बालकाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आलीय. टागोरनगरमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये शंभर रुपयांचा चॉपर मिळून आलाय तर दुसऱ्या एका मुलाच्या बॅगेत कोयता आढळून आलाय. 

खड्यांमुळे मृत्यू झाल्यास अधिकारी , कंत्राटदार जबाबदार, कुटुंबाला द्यावी लागणार ६ लाखांची भरपाई

गस्तीवर असलेल्या पोलिसांनी याबाबत दोघांना विचारणा केली. त्यावेळी 'हे शस्त्र आमचे नसून मित्रांनी आमच्याकडे ठेवायला दिले असं उत्तर दिलं आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणलं. या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली. दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. 

नाशिक : पिकअपच्या धडकेत कामगार ठार

शाळेच्या नावाखाली मुले नक्की काय करत आहे. नक्की शाळेतच जातात का , की आणखी बाहेर कुठे जातात . शाळेत त्यांचा अभ्यासच सुरु आहे की कोना मित्राला पाहून गुन्हेगारीचे धडे घेत आहे , हे पालकांनी वेळोवेळी पाहिलं पाहिजे , त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group