नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : दुचाकीने घरी जाणारा कंपनी कामगार भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना सातपूर येथे घडली. याबाबत हरिचंद्र बळवंत टोपले (रा. मोर्हांडा, ता. मोखाडा, जि. पालघर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार , त्यांचा मुलगा सुरेंद्र हरिचंद्र टोपले (वय 24) हा सातपूर एमआयडीसीतील एसएसव्ही एंटरप्रायजेस या कंपनीत कामाला होता. कामावरून सुट्टी झाल्यावर तो एमएच 48 डीएन 2813 या क्रमांकाच्या मोटारसायकलीने घराकडे जात होता. त्यावेळी सातपूर एमआयडीसीतील रिद्धीसिद्धी कंपनीच्या गेटसमोरील रस्त्यावरून सुरेंद्र टोपले जात होता.
दरम्यान , भरधाव आलेल्या एमएच 15 जीव्ही 9119 या क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनावरील चालक चंदर वाळू लोणे याने टोपले याच्या दुचाकीस जोराची धडक मारली. त्यात सुरेंद्र टोपले हा गंभीर होऊन जागीच ठार झाला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात पिकअपचालक चंदर लोणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.