Nashik : घंटागाडीचे चाक डोक्यावरुन गेल्याने तरुणीचा मृत्यू; आज सकाळची घटना
Nashik : घंटागाडीचे चाक डोक्यावरुन गेल्याने तरुणीचा मृत्यू; आज सकाळची घटना
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- घंटागाडीने धक्का दिल्याने झालेल्या अपघातात घंटागाडीचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी रासबिहारी शाळेच्या चौकात घडली. 



याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विनिता रामचंद्र कुयटे (वय २७, रा. भावबंधन कार्यालयाजवळ, हनुमानवाडी, पंचवटी) या आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या अ‍ॅक्टिव्हावरुन जात होत्या. रासबिहारी चौकात एका घंटागाडीने त्यांना धक्का दिल्याने त्या खाली पडल्या.

तेव्हाच घंटागाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.  घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती
इतर बातम्या
Join Whatsapp Group