Video : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने मुली  उडाल्या थेट हवेत
Video : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने मुली उडाल्या थेट हवेत
img
Dipali Ghadwaje
मुंबईतील भीषण रस्ता अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेत दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अनेक लोक रस्ता ओलांडताना दिसत आहेत.

दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या मुलींना धडक दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐशानी जाधव (१४) आणि जान्हवी कनोजिया (१४) अशी जखमी मुलींची नावे आहेत. दोघींनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

ही घटना मुंबईतील गावदेवी परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक रस्ता ओलांडताना दिसत आहेत. दरम्यान, दोन मुली आणि एक मुलगा रस्ता ओलांडू लागले. मुलींनी रस्ता ओलांडण्यासाठी पाऊल टाकताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली आहे. त्यामुळे या मुली हवेत उडाल्या आणि खाली  पडल्या आहेत.


या घटनेत दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. मुली जखमी झाल्याचं पाहून कारचालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. या अपघातातील कारबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group