शिवव्याख्याते बारुळकर महाराजांचे भीषण अपघातात निधन
शिवव्याख्याते बारुळकर महाराजांचे भीषण अपघातात निधन
img
वैष्णवी सांगळे
कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारावर काळाने घाला घातला. वारकरी परिषदेची बैठक आटोपून दुचाकीने आपल्या गावी बारूळ येथे जातं असलेल्या ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर यांना एका भरधाव टिप्प्परने चिरडलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी नांदेड शहरातील सिडको परिसरात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे. 



माहितीनुसार, नांदेड येथे शिव कुटुंब मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा झाल्यानंतर महाराज आपल्या दुचाकीने स्वगावी बारूळकडे निघाले होते. यावेळी ढवळे कॉर्नर येथे आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की महाराजांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक जाण्याने सामाजिक आणि प्रबोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर हे कंधार तालुक्यातील बारूळ येथील रहिवासी आहेत. शिवाय मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देखील होते. मागील अनेक वर्षापासून संघटनेत जोमाने काम करत होते. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून अंधश्रद्धेपासून समाज दूर राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group