भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मन विचलित करणारा व्हिडिओ व्हायरल
भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मन विचलित करणारा व्हिडिओ व्हायरल
img
वैष्णवी सांगळे
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील या अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ३ जानेवारीला ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या ट्रकसमोर अचानक दुचाकीस्वार आला. त्याला वाचवताना ड्रायव्हरने ट्रकचं स्टिअरिंग फिरवलं. त्यानंतर त्याचा स्टिअरिंगवरील ताबा सुटला. तो ट्रक थेट दुसऱ्या मार्गिकेत घुसला. समोरून कार भरधाव जात होती. त्या कारला हा ट्रक धडकला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. 

या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातील दृश्ये विचलित करणारी आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग चारपदरी असल्याचं दिसून येतं. बरुआ जंक्शनजवळ एक ट्रक भरधाव वेगात जात आहे. त्याच्याच पुढे काही अंतरावर एक दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभा आहे. अचानक दुचाकीस्वार वळण घेतो. पण भरधाव येणारा ट्रक त्याला दिसला नाही. ट्रक ड्रायव्हरनं ते बघितलं आणि स्टिअरिंग वळवली. पण त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. तो ट्रक दुसऱ्या लेनमध्ये घुसला. त्याचवेळी त्या लेनवर समोरून कार येत होती. तो ट्रक जोरानं कारवर आदळला. त्यानंतरही ट्रक थांबला नाही. तो थेट महामार्गाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत गेला.आणि अपघात झाला. 

अपघातानंतर या महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांची गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यमुखी पडलेले तिघेही ओडिशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group