खळबळजनक ! ३२०० कोटींच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी 'हा' मोठा खासदार अटकेत
खळबळजनक ! ३२०० कोटींच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी 'हा' मोठा खासदार अटकेत
img
वैष्णवी सांगळे
आंध्र प्रदेशमधून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ३२०० कोटींच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी खासदाराला अटक करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत खासदार पी.व्ही. मिधुन रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी, त्यांनी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी यांच्या विरोधात यशस्वीपणे निवडणूक लढवली आणि ७६,००० हून अधिक मतांनी त्यांचा पराभव केला.

एसआयटीने शनिवारी कथित आंध्र प्रदेश मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी कारवाई करत मिधुन यांना अटक केली आहे. मिधुन हे राजमपेट येथील तीनवेळा खासदार आहेत आणि पक्षातील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे, सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वायएसआरसीपीला त्यांच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. ते केवळ पक्षातील एक प्रमुख नेते आणि पेद्दीरेड्डी यांचा मुलगा असल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे. 

एसआयटीनुसार, काही स्थानिक मद्य ब्रँड्सना फायदा देण्यासाठी कथित मद्य धोरण तयार केले गेले होते, ज्यात लोकप्रिय मद्य ब्रँड्सच्या जागी कमी ज्ञात ब्रँड्स आणले गेले आणि त्या बदल्यात ३,२०० कोटी रुपयांची लाच घेण्यात आली. अटक नोटिसीनुसार, “मिधुन हे घोटाळ्याचे सुरुवातीपासून मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी धोरणात्मक बदल घडवून आणले आणि डिस्टिलरीज आणि पुरवठादारांकडून लाच मिळवण्यासाठी सह-आरोपींशी समन्वय साधला,” असा आरोप त्यांच्यावर आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group