पुण्यात पावसाचा कहर! कुंडमळानंतर आणखी एक पूल वाहून गेला ; परिसरात मोठी खळबळ
पुण्यात पावसाचा कहर! कुंडमळानंतर आणखी एक पूल वाहून गेला ; परिसरात मोठी खळबळ
img
DB
पुण्याच्या मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. कुंडमळ्यातील लोखंडी पूल कोसळल्याची घटना ताजी असताना आणखी एक पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.



पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट येथे नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे हा पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या पुलाच्या उद्घाटनापूर्वी या तात्पुरत्या पुलाचा वापर केला जात होता. हाच पूल आता वाहून गेल्याचे समोर आले आहे.  पिंरगुट येथील तात्पुरता पूल वाहून जाण्याची घटना घडण्यापूर्वी नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच पुलाच्या उद्घाटनाचा समारंभ संपन्न झाला होता.

त्यामुळे तात्पुरत्या पुलाऐवजी नव्या पुलाचा वापर सुरु करण्यात आला आहे. नवीन पूल सुरु झाल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले जात आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group