मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दिवसेंदिवस हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. असे असतानाच रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलिस हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ४६ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय. मृत पावलेल्या महिलेचे नाव नलिनी प्रविण म्हात्रे असे आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या वडखळ पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या डोलवी गावाजवळ असणाऱ्या पुलावर सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मयत नलिनी प्रविण म्हात्रे (ता. पेण, जि.रायगड) ह्या त्यांच्या ताब्यात असलेल्या TVS कंपनीची ज्युपिटर घेऊन रोहा तालुक्यातील कोलाड सुतार वाडी येथे मुलगा वल्लभ यांचे कॉलेजमध्ये पालकाची मिटींग असल्याने जात होत्या.
दरम्यान मौजे डोलवी गावाजवळील पुलाजवळ सकाळी सुमारे ७:३० वाजता अज्ञात वाहनाने त्यांना ठोकर मारली. या अपघातानंतर वाहन येथून निघून गेले. या अपघातात मयत नलिनी प्रविण म्हात्रे या गाडीवरून खाली पडल्या. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर असणारे हेल्मेट फुटून अज्ञात वाहन हे डोक्यावरून वाहन गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास महिला पोलिस उप निरीक्षक योगिता सांगळे करीत आहेत.अशा प्रकारच्या अपघातांबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस नागरिकांना करत आहेत.