भीषण अपघात ! उड्डाणपुलावर स्कूल व्हॅनची बसला जोरात धडक, दोघांचा मृत्यू
भीषण अपघात ! उड्डाणपुलावर स्कूल व्हॅनची बसला जोरात धडक, दोघांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
नागपूरच्या मानकापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात झालाय. शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या व्हॅनला समोरून आलेल्या स्कूल बसने जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की व्हॅनचा पुढचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. शुक्रवारी सकाळी झालेल्या या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

..तर नोकरी सोडावी लागणार ! शिक्षकांवर सेवानिवृत्तीची टांगती तलवार

मागील काही दिवसांपासून उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत होती आणि एका बाजूने दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होती. त्याचवेळी कोराडी येथून भवन्स विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन मानकापूर पुलावरून जात होती. याचवेळी विरुद्ध दिशेने नारायणा विद्यालयाची रिकामी बस वेगाने येत होती. बस चालकाचा वेग आणि बेपर्वाईमुळे समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

आजचे राशिभविष्य १३ सप्टेंबर २०२५ : विरोधकांकडून कामाचे कौतुक होणार की विरोधक अडचणी वाढवणार ? वाचा राशिभविष्य

जखमींना  तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. आठ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतांमध्ये भवन्स विद्यालयातील सहावीतील विद्यार्थिनी सानवी देवेंद्र खोब्रागडे आणि स्कूल व्हॅन चालक ऋतिक कनोजीया यांचा समावेश आहे. मृत विद्यार्थिनी सानवी आणि व्हॅन चालक ऋतिक यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group