मेष - आज कारण कोणतेही असो, किरकोळ कारणावरून का होईना तुमची मानसिकता बिघडू शकते. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका.
आपले काम भले नि आपण भले. हे सूत्र लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. आज कुटुंबातील सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासह एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाल.
वृषभ - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज तुमचे विरोधकही तुमच्या कामाचे कौतुक करतील. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने सर्व काम हाताळाल. आज तुम्हाला व्यवसायाच्या निमित्ताने शहराबाहेर जावे लागू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेची जाणीव होईल. आज तुम्हाला गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल आणि मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल.
मिथुन - आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त राहणार आहे. आज तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही सामाजिक कार्यात मदत करण्याचा विचार कराल. व्यवसायात नियोजनबद्ध पद्धतीने काम करून तुम्हाला नफा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
कर्क - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज ऑफिसमधील तुमचे सहकारी तुमच्या विचारांनी प्रभावित होतील, परंतु तुम्ही इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळावे. तुमचा जोडीदार आज तुम्हाला आनंद देईल. आज तुम्हाला तुमच्या कामात तुमच्या पालकांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल.
सिंह - आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे आज तुम्ही आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी कराल. वैवाहिक जीवनात अधिक गोडवा येईल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहणार आहे, त्यांना पक्षात काही नवीन जबाबदारी मिळेल. आज ऑफिसमध्ये बॉसचा वाढदिवस असेल. तुम्ही काही गिफ्ट मागवलं असेल तर डिलिव्हरी कधी होणार हे चेक करा.
कन्या - आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन आला आहे. आज काही चांगली बातमी मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला एखाद्याला मदत करावीशी वाटेल. काही लोक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात.आज बाहेरचे खाणे टाळा. नोकरीच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आज कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
तुळ - आज तुमचा दिवस व्यस्ततेने भरलेला असेल. आज तुम्ही जुन्या गोष्टींमध्ये अडकणे टाळावे. प्रेमी एकमेकांच्या भावना समजून घेतील आणि कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून आदर मिळण्याची शक्यता आहे. जे व्यवसाय करतात त्यांना नवीन अधिकार मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला उत्पन्न आणि खर्चात समतोल ठेवावा लागेल.
वृश्चिक - आज तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे काही नवीन मार्ग तुमच्या मनात येतील. तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांसोबत शेअर केले पाहिजेत, यामुळे तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या समस्यांवर उपाय मिळेल. एकत्र केलेल्या कामात तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळेल.
धनु - आज तुम्हाला नवीन कामे करण्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमचे मन देवाच्या भक्तीत गुंतलेले असेल, तुम्ही अशा मंदिरात जाऊ शकता जिथे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही नवीन आयाम स्थापित कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळाल्यास वातावरण आनंददायी असेल, परंतु कोणाच्याही प्रभावाखाली येऊन मोठी गुंतवणूक करू नका.
मकर - आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. तुमचा बॉस तुम्हाला एक नवीन जबाबदारी देऊ शकतो जी तुम्ही पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने पार पाडाल, तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुमच्याकडे उत्पन्नाचे नवीन स्रोत असतील, तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. आज तुम्हाला कला आणि साहित्य क्षेत्रात रस असेल.
कुंभ - आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज तुम्ही दैनंदिन कामांमध्ये जास्त वेळ घालवू शकता. व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी आज तुमच्यासाठी वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे चांगले राहील. आज तुम्ही वडीलधाऱ्यांना नमस्कार करा. आज संपत्तीत वाढ होईल. आज तुमच्या मुलांच्या भविष्याशी संबंधित चांगली बातमी मिळेल. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
मीन - आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज घरातील वडीलधाऱ्यांच्या मदतीने तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून काही चांगली बातमी मिळेल. तुमचा जोडीदार आज तुम्ही जे काही बोलता ते समजून घेण्याचा प्रयत्न करेल, यामुळे नात्यात ताजेपणा येईल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही इन्फेक्शन पासून दूर राहा. आरोग्याच्या नियमांचे पालन करा.