मेष - तुमच्या भावंडांसोबत असलेले मतभेद आज दूर होतील. तुम्ही भूतकाळातील चुकीबद्दल समेट करण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमचा व्यवसाय वाढेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. जर तुम्ही काही धोकादायक ठिकाणी पैसे गुंतवले असतील तर आज नशीब तुमची साथ देईल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे, विशेषतः जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि तुमचा दिवस आनंदाने जाईल. मात्र आज तुमचे आरोग्य थोडे कमजोर राहू शकते ज्यामुळे तुम्हाला कामात लक्ष लागणे थोडे कठीण जाईल. आजच्या दिवसाची मनासारखी सुरूवात न झाल्यामुळे चिडचिड होणार, तो राग जोडीदारावर काढू नका नाहीतर ब्रेकअप होऊ शकत.
मिथुन - आज तुम्ही मित्रांसोबत सहलीची योजना आखाल. पण ऑफिसचे महत्वाचे काम आल्यामुळे प्लान कॅन्सल होऊ शकतो. बदलीची इच्छा असणाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदलीची चांगली बातमी मिळेल.आज तुम्ही स्वतःसाठी काहीतरी खरेदी करू शकता जसे की नवीन मोबाईल किंवा नवीन कपडे. मुलांना चांगले काम करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. आज तुमच्या भावासोबत तुमचे थोडे मतभेद होऊ शकतात.
कर्क - तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आज व्यवसायात यश मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. भौतिक सुख-सुविधा वाढतील. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. आज सकाळी तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. यामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या सर्व गरजा सहज पूर्ण करू शकाल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. भविष्याबद्दलची तुमची चिंता कमी होईल. आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील.
सिंह - आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुमच्या व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादा साईड बिझनेस देखील करू शकता, ज्यामुळे नफा होण्याची शक्यता आहे. राजकारणात रस असलेल्यांना उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी शुभ आहे. आज ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून तुम्हाला रोषाचा सामना करावा लागू शकतो.
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उंची देणारा आहे. आज तुम्ही काहीही केले नाही तरी तुमचे महत्त्व कमी होणार नाही. आज धनवृद्धी झाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सासरच्या कोणा व्यक्तीने तुमच्याकडून पैसे उधार घेतले असतील तर ते आज परत मिळू शकतात. विद्यार्थ्यांना भविष्यातील योजनांवर काम करण्याची संधी मिळेल. जर मुलांच्या विवाहामध्ये काही समस्या येत असतील तर त्या आज दूर होतील.
तुळ - आज तुमच्या कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. तुम्हाला मोठी जबाबदारी घ्यावी लागू शकते. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंददायी अनुभव येतील. नोकरीच्या ठिकाणची आणि घरातील सर्व कामे आज सहज पूर्ण होतील. गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेला व्यवसाय पुन्हा चांगला सुरू होईल.नोकरी शोधणाऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल.
वृश्चिक - बऱ्याच काळानंतर, आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. अडकलेली कामं आज मार्गी लागतील. तुमच्या घरगुती जीवनात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. डिप्लोमा विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून महत्त्वाची माहिती मिळेल. तुमच्या दुर्लक्षामुळे आज घरातील वातावरण थोडे अशांत होऊ शकते. प्रॉपर्टीशी संबंधित एखादा कायदेशीर वाद चालू असेल तर त्यातही आज तुम्हाला यश मिळू शकते. आज घरात एखाद्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते.
धनु -आज दैनंदिन कामांमध्ये जास्त वेळ लागू शकतो. व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. वडीलधाऱ्यांचे पाय धरा, कारण तुमची संपत्ती वाढेल. तुमचे वडील त्यांच्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.
मकर -परदेशात व्यवसाय करण्याची योजना आखत असाल तर नीट माहिती घ्या मगच पाऊल उचला. सोशल मीडियावर तुमचे एखाद्याशी संभाषण होऊ शकते, जे भविष्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. व्यायामामुळे मधुमेहाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होईल.
कुंभ - आज तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढेल. तुमचे कुटुंब तुमच्या काही कामांसाठी तुमची प्रशंसा करेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक रस निर्माण होईल. तुमच्या नोकरीत काही सकारात्मक बदल घडतील.
मीन - आज नातेवाईकांसोबत सुरू असलेला वाद संपेल. बाहेर जास्त खाणं-पिणं टाळावं आणि आरोग्याची नीट काळजी घ्यावी. आज तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील.