आजचे राशिभविष्य २५ डिसेंबर २०२५ : तुमच्या राशीत आज काय ? वाचा
आजचे राशिभविष्य २५ डिसेंबर २०२५ : तुमच्या राशीत आज काय ? वाचा
img
वैष्णवी सांगळे
मेष राशी - आज पार्टी आणि पिकनिकचे नियोजन केले जाईल. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्हाला आज स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद मिळेल. आज नवीन काम सुरू करताना काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील सदस्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांशी कामावरून वाद होऊ शकतात. खर्च वाढल्याने आणि कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण जाणवेल.

वृषभ राशी - वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने सामान्य राहील. कार्यक्षेत्रात यशाचे योग आहेत. भागीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखाल. ज्यात यश मिळेल. कामानिमित्त प्रवासाला जावे लागू शकते. कुटुंब, पत्नी आणि मुलांसोबत वेळ आनंदात जाईल. कोर्टाशी संबंधित काम अनुकूल राहील. नफ्याच्या संधी तुमच्या वाट्याला येतील. आयुष्यात आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला कनिष्ठांकडून सहकार्य मिळेल.

मिथुन राशी - आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येईल. एखादी नवीन संधी तुमची वाट पाहत आहे. मित्राच्या मदतीने मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी मिळू शकते. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून सावध राहा. आज घरात आणि बाहेर देखील क्लेश जाणवेल. कामात अडथळे येतील. नोकरीत उत्पन्नात घट आणि कामाचा ताण कमी होईल. आज लोक तुमच्याशी विनाकारण वाद घालू शकतात. 

कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांना आज जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. कार्यक्षेत्रात बदल करणे तुमच्या हिताचे ठरेल. एखाद्या खास व्यक्तीच्या भेटीमुळे तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक सुधारणा होईल. अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील, मात्र कुटुंबातील कोणाचे तरी आरोग्य बिघडू शकते. डोळ्यांत आज वेदना होऊ शकतात. व्यवहारात सावधगिरी बाळगा. मकर राशीच्या लोकांनी कोणालाही न विचारता सल्ला देऊ नये. पुनर्प्राप्तीचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायिक ट्रिप अनुकूल राहील. 

सिंह राशी -  आज केलेले प्रयत्न यशस्वी होतील. एखाद्या महत्वाच्या कामाची समस्या सुटेल. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. कर्ज कमी होईल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या इच्छेनुसार व्यवसाय चालेल. सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस जपून चालण्याचा आहे. प्रवासात आपल्या सामानाची आणि पैशांची काळजी घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणतीही मोठी ऑफर मिळाल्यास विचारपूर्वक गुंतवणूक करा. 

कन्या राशी - आज तुम्हाला दूरवरून एखादी चांगली बातमी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कामात सहकारी तुम्हाला साथ देतील. व्यवसायात घाई करू नका. दुखापत आणि अपघात टाळा. नफ्याच्या संधी आज तुमच्या वाट्याला येतील. घराबाहेरील परिस्थिती अनुकूल असू शकते. आनंदाचे वातावरण असेल. कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. .

तूळ राशी - तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन मोठे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. यात कुटुंब आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि वादांपासून दूर राहा, अन्यथा बनलेले काम बिघडू शकते. पत्नी आणि मुलांच्या प्रकृतीमुळे आर्थिक बजेट कोलमडू शकते. 
आज तुमच्या उत्साहावर नियंत्रण ठेवा. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. व्यावसायिक सहली यशस्वी होतील.

वृश्चिक राशी - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज तुमचे मन अशांत राहू शकते. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीबद्दल वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे. तब्येत खालावल्यासारखी वाटेल. उत्पन्नाच्या बाबतीत नुकसान सहन करावे लागू शकते. भागीदारीत दुरावा येण्याची शक्यता असून मालमत्तेच्या वादातून न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जावे लागेल.

धनु राशी -  अनपेक्षित खर्च येतील. खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा अडचणी येऊ शकतात. व्यवसायात मंदी येईल. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात.आज लांबचा प्रवास करताना वाहन सावधगिरीने चालवा, दुखापत होण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे आज टाळावे. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. काही कारणास्तव तुम्हाला पत्नी आणि मुलांसह दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागू शकते. 

मकर राशी - मकर राशीच्या लोकांना मुलांच्या शिक्षणाबाबत आज चिंता राहील. पत्नी आणि मुलांच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. संसर्गजन्य आजारांपासून सावध राहा. कौटुंबिक वादात पडू नका, अन्यथा नुकसान तुमचेच होईल.

कुंभ राशी - आज जोडीदाराकडून पाठिंबा मिळाल्याने आनंद होईल. स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून मोठा नफा होऊ शकतो. तुमच्या नोकरीत तुम्हाला तुमच्या कनिष्ठांकडून सहकार्य मिळू शकेल. व्यवसाय चांगला चालेल. उत्पन्न वाढेल. दुखापत आणि आजारामुळे अडथळे येण्याची शक्यता आहे

मीन राशी - मीन राशीचे लोकांना आज धार्मिक यात्रेला जाण्याचे योग आहेत. व्यवसायात लाभाची स्थिती राहील. प्रवासात स्वतःच्या सामानाची सुरक्षा करा. कुटुंबात पालकांचे आरोग्य बिघडू शकते आणि पत्नीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group