आजचे राशिभविष्य ! ६ ऑक्टोबर २०२५:  आज 'या' राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी
आजचे राशिभविष्य ! ६ ऑक्टोबर २०२५: आज 'या' राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी
img
वैष्णवी सांगळे
मेष  - मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद होईल. सरकारी कामात निष्काळजीपणा टाळा. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कारण मौजमजेच्या वस्तूंवर जास्त खर्च होऊ शकतो. ज्यामुळे भविष्यात समस्या येऊ शकते. तुमच्या उत्पन्नाचा विचार करूनच खर्च करा.कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने काही बदल होतील, त्यातून तुमचे सहकारी हताश होतील आणि त्यांचा मूड खराब होऊ शकतो. 


वृषभ - वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहण्याचा आहे. जर तुम्हाला कोणती जुनी समस्या असेल, तर त्यातून तुमची सुटका होईल. आज तुम्हाला तुमची महत्त्वाची माहिती मिळू शकते. भावाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमची एखादी मनोकामना पूर्ण होऊ शकते.आजचा दिवस कुटुंबासोबत सुखात जाईल. तुमच्या नशिबाने दुपारपर्यंत एखादी आनंदाची बातमी मिळेल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन - मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत, त्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. कामाच्या संदर्भात मित्रांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या पदाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका. घरी पाहुणे आल्याने कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर दुसऱ्या ठिकाणी अर्ज करू शकता.

कर्क - कर्क राशीच्या व्यक्तींचा दिवस कामात अधिकाधिक व्यस्त राहील. अनावश्यक खर्चापासून दूर राहा. वाहनांचा वापर करताना सावध राहा.  एखाद्या सामाजिक कार्यक्रमात मान-सन्मान मिळेल. आजचा दिवस तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी चांगला आहे. आर्थिक व्यवहार तुम्हाला त्रास देऊ शकतात. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल, तर ते फेडण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या जवळच्या लोकांशी कोणतीही महत्त्वाची माहिती शेअर करू नका.

सिंह - सिंह राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस आरोग्याच्या बाबतीत सावध राहण्याचा आहे, कारण तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात निष्काळजीपणा करु शकता. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या सेवेसाठी तुम्ही वेळ काढाल. वाहनात अचानक बिघाड झाल्यामुळे तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करू शकता. तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाला भेटायला जाण्याचा विचार करु शकता. जर तुम्ही कोणाला वचन दिले असेल, तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

कन्या - कन्या राशीच्या व्यक्ती आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात ते यशस्वी होतील. तुमच्या बॉसकडून शाबासकी मिळू शकते. व्यवसायात काही चढ-उतार येतील, परंतु तुम्ही घाबरणार नाही. एखाद्या कौटुंबिक समस्येमुळे तुमचे मन उदास राहील. विनाकारण धावपळ करणे टाळा. तुम्ही तुमच्या कामांमध्ये जबाबदारी दाखवाल. तुम्ही फिरण्याची योजना आखू शकता. मुलांच्या करिअरबाबत मित्र तुम्हाला चांगले सल्ला देतील.

तूळ - तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सुखमय राहील. वैवाहिक जीवनातील समस्यांपासून दिलासा मिळेल. तुम्ही घरासोबत इतर कामांवरही पूर्ण लक्ष द्याल. जोडीदारासोबत खरेदीसाठी जाल. तुम्ही निस्वार्थपणे लोकांचे भले कराल, पण लोक याला तुमचा स्वार्थ समजू शकतात. तुम्ही घरी पूजा-पाठ आयोजित करू शकता, जिथे नातेवाईकांचे येणे-जाणे राहील. आज शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहारांमध्ये निष्काळजीपणा करु नये. सासरकडील एखादी व्यक्ती तुम्हाला भेटायला येऊ शकते. तुम्ही तुमच्या मुलाला/मुलीला सरकारी कोचिंगची तयारी करून देऊ शकता. तुमच्या घाई करण्याच्या सवयीमुळे आज गडबड होऊ शकते. बॉस तुमच्या कामात वाढ करेल. ज्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. परंतु त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.

धनु - धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चांगला राहील. तुम्हाला तुमच्या भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही बचतीच्या योजनांवर पूर्ण लक्ष द्याल. ज्यामुळे तुम्ही भविष्यासाठी काही गुंतवणूक करू शकता. तुमच्या कोणत्याही सहकाऱ्याच्या ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे एखादे थांबलेले काम पूर्ण होईल. तुम्ही कुटुंबासोबत पिकनिक काढण्याची योजना आखू शकता.

मकर - मकर राशीच्या व्यक्तींना आज कामाचा काहीसा तणाव जाणवेल. आयुष्यातील अडचणींमुळे तुमचे मन अध्यात्माकडे वळेल. नकारात्मकता बाजूला सारून फक्त महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कामानिमित्त प्रवास होईल, खर्चावर नियंत्रण ठेवा. आज व्यावसायिक क्षेत्रात मनाप्रमाणे लाभ असून मानसिक समाधान असेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक उत्तम होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल .वाहन वापरताना काळजी घ्यावी, वाहन अचानक खराब होऊन खर्च वाढू शकतो.

कुंभ - कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. तुमच्या कला-कौशल्यात सुधारणा होईल. तुमची निर्णय घेण्याची क्षमताही चांगली राहील. आज तुम्ही एक मोठे लक्ष्य घेऊन चालाल, तरच ते सहज पूर्ण होईल. वाहने वापरताना थोडे सावधगिरी बाळगा. आज कार्यक्षेत्रात एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वकच गुंतवणूक करा.

मीन - मीन राशीचे व्यक्तीचा आजचा दिवस थोडा कठीण असू शकतो. तुमच्या एखाद्या सहकाऱ्याशी विनाकारण भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला कठोर शब्द ऐकावे लागू शकतात. जीवनसाथीच्या शारीरिक समस्येमुळे तुम्ही त्रस्त राहाल. तुमच्या मनात सुरू असलेल्या चिंतेबद्दल तुम्ही तुमच्या आईशी बोलू शकता. सरकारी योजनांचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group