मेष - जर तुम्ही सध्या मालमत्ता विकण्याच्या किंवा खरेदी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी किंवा प्रेमींसाठी एखादी भेटवस्तू खरेदी कराल. दुसरीकडे तुमच्या नोकरी व्यवसायात कामाचा ताण अधिक असेल. अशातच आज तुमची गाडी बिघडू शकते ज्यामुळे तुम्ही वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचणार नाही.
वृषभ - आज, तुमचा समजूतदारपणा आणि शहाणपणा तुम्हाला समस्या सहजपणे सोडवण्यास मदत करेल. दीर्घ काळानंतर तुम्हाला एखाद्या कामाशी संदर्भात एखादी शुभवार्ता मिळू शकते. महत्वपूर्ण कामे तुमची आजच्या दिवशी यशस्वीरीत्या पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला आज अत्यंत फायदा होईल. आज एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी भेट होऊ शकते. ही भेट कामाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल.
मिथुन - आज तुम्ही एका महत्त्वाच्या कौटुंबिक विषयावर चर्चा कराल आणि याचे सकारात्मक परिणाम मिळतील. आज, कोणी बाहेरील व्यक्ती तुमच्या कामाच्या वातावरणात काही समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. सरकारी कामात झालेले बदल डोकेदुखी ठरू शकते. मात्र प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतो यावर विश्वास ठेवा.
कर्क - आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांसाठी थोडा वेळ बाजूला ठेवा. त्यामुळे मानसिक शांतता मिळेल. तुम्ही जर कायम दुसऱ्यांवर अवलंबून असाल तर ही सवय सोडावी लागेल. तरच तुमची प्रगती होऊन सर्व कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. मेहनतीने काम केल्यास वेळ लागेल मात्र कायमस्वरूपी फायदा होईल.
सिंह - आज तुम्हाला एका खास कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. खर्च जास्त असेल, परंतु वाढत्या उत्पन्नामुळे पैशांची चिंता कमी होतील. आज तुमच्या मुलांचे निकाल पाहून समाधान मिळेल. आज तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित कराल आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कोणतेही धोके टाळाल.
कन्या - समाजसेवेच्या क्षेत्रात तुमचा कल वाढेल. तुम्हाला सामाजिक कार्य करताना प्रगती दिसून येईल. तुम्ही जर एखाद्या सामाजिक संस्थेशी जोडला असाल तर त्यातून तुम्हाला लाभ होईल कामात प्रगती यश दिसून येईल. आज जीवनात यशस्वी होण्याच्या काही संधी तुम्हाला मिळतील. बॉस सोबत वाद होऊ शकतो. जमिनीशी निगडीत महत्वाची कामं होतील.
तुळ - विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे, परंतु त्यांना अभ्यासात अजून जास्त मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. ऑफीसमधल्या कठीण कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल.
वृश्चिक - आज, तुम्ही एखादे काम वेळेवर आणि सहजपणे पूर्ण करण्याचे नवीन मार्ग विचारात घ्याल, ज्यामुळे तुम्हाला ते वेळेवर आणि सहजपणे पूर्ण करण्यास मदत होईल. आज संध्याकाळी, तुम्ही वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्याची योजना कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल.
धनु - वैयक्तिक समस्या सोडवल्याने मनःशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम सुधारेल. तुम्हाला काही कामांमध्ये मदतीची आवश्यकता असू शकते आणि एक चांगला मित्र यामध्ये तुमची मदत करू शकतो. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास मदत करू शकतो.
मकर - आज तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. काम कितीही कठीण असले तरी, तुम्ही तुमची एकाग्रता कायम ठेवली पाहिजे. आज तुम्हाला कामावर एक नवीन प्रकल्प मिळेल आणि तुमचे सहकारी ते पूर्ण करण्यास मदत करतील. मुलांच्या यशाने आनंद मिळेल.
कुंभ - आज तुम्ही तुमचे व्यावसायिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न कराल आणि एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी किंवा राजकारण्याशी भेट होणे फायदेशीर ठरेल. आज व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. व्यापार आणि बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस विशेषतः फलदायी आहे. तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहू शकता. आज तुमचे आरोग्य चांगले राहील.
मीन - आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळवण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता असेल. तुम्ही कोणाशीही वाद घालणे टाळा. तुम्हाला ऑफीसच्या कामात तुमच्या क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. पण तरीही सावध रहा. कोणीही धोका देऊ शकतं.