आजचे राशिभविष्य १७ फेब्रुवारी २०२६ : तुमच्या राशीत आज काय खास ? वाचा
आजचे राशिभविष्य १७ फेब्रुवारी २०२६ : तुमच्या राशीत आज काय खास ? वाचा
img
वैष्णवी सांगळे
मेष - आजचा दिवस कामाशी संबंधित गोष्टींसाठी अधिक चांगला लाभदायक ठरेल. व्यवसाय नोकरीत तुम्हाला चांगले अनुभव येतील. सहकाऱ्यांची साथ कामात मिळेल. तुमचा स्वभाव मधुर असल्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यापारात लाभ होईल. कामाची प्रशंसा होईल व पदोन्नती होण्याचे देखील योग आहेत.

वृषभ - विदेशातील मित्राच्या ख्याली खुशालीची माहिती मिळेल. ज्या लोकांना परदेशात जायचं आहे, त्यांनी तयारी सुरू करा. तुम्हाला परदेशात जाण्याचा योग आहे. त्याशिवाय धार्मिक स्थळी जाण्याचाही योग आहे. ऑफिसमधील कामाचा व्याप वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही चिडचिडे व्हाल. पण रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल

मिथुन - आज तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज कोर्ट कचेरीच्या प्रकरणात तुम्हाला थोडा अराम मिळेल काही निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. आज मनावरची मरगळ दूर होईल तुम्ही उत्साहाने काम कराल. एखादी शुभ वार्ता तुम्हाला अचानक मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.

कर्क - सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात व्यस्त राहाल. कपडालत्ता, सोनंचांदी खरेदी कराल. सिनेमा, नाटक पाहण्यात रमून जाल. आजचा दिवस म्हणजे फुल्ल एन्जॉयचा आहे. सुखाचा अनुभव घ्याल. दाम्पत्यजीवनात प्रेमाची अनुभूती येईल. भागिदारीतील व्यवसायात लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं मन उत्साहाने भरलेलं असेल. बाहेर जाण्याचा योग आहे. 

सिंह - आज तुम्ही खिन्नता अनुभवाल. भय आणि उदासीनतेने पछाडले जाल. घरात सुखशांती लाभेल. दिनचर्या व्यस्त असेल. परिश्रम करण्यात तुमचा हात कोणीही पकडणार नाही. वरिष्ठांसोबत वाद घालू नका. ऑफिसमधील टार्गेट पूर्ण करण्यात अडचणी येतील. व्यापार वाढवण्यासाठी कोणत्याही योजनेवर आताच निर्णय घेऊ नका. 

कन्या - पोटाची समस्या जाणवेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. अचानक मोठा खर्चा होण्याची शक्यता आहे. वेळेवर कामावर न आल्याने अडचणीचा सामना करावा लागेल. बॉसला हलक्यात घेऊ नका. नाहीतर अडचणी वाढतील. आज तुम्ही बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. 

तुळ -आज तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. सातत्याने विचार करत असल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडेल. घरातील स्त्रियांची काळजी वाटेल. आज प्रवास करणं टाळा. ते तुमच्या हिताचं असेल. जेवण आणि झोप वेळेत न मिळाल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटेल. वडिलोपार्जित संपत्तीच्या प्रकरणात सावध पावलं उचला. सरकारी कामात निष्काळजीपणा करू नका. 

वृश्चिक - आजचा संपूर्ण दिवस प्रसन्न जाईल. एखाद्या नव्या कामाची सुरुवात कराल. वरिष्ठांसोबत महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व येईल. ऑफिसमध्ये तुम्ही नवीन गोष्टी सुरू करू शकता. तुमच्या कामाचं कौतुक होईल.कोणत्याही कामात आज तुम्हाला यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

धनु - आजचा दिवस संमिश्र जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्ती महत्त्व देत नसल्याने अडचण वाढेल. आज तुमचं मनोबल दृढ नसल्याने तुम्हाला निर्णय घेताना अडचणी येतील.व्यवसायात आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. चुकीच्या ठिकाणी खर्च होईल. 

मकर -आजचा दिवस भक्तीमय राहील. दिवसभर पूजाअर्चा आणि धार्मिक कार्यात गुंतवून घ्याल. सर्व कामे व्यवस्थित मार्गी लावाल. मित्र आणि हितचिंतकांकडून आज भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. जुने वादविवाद दूर होतील. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. उधारी देऊ नका, नाही तर पैसे बुडतील.

कुंभ - आज तुम्ही कुणाची बाजू घेऊ नका. नाही तर तुमच्यावर पक्षपातीपणाचा आरोप होईल. कुणासोबतही पैशाची उसनवारी करू नका. खर्च वाढू शकतो. स्वकीयांची नाराजी कायम राहील. कुणाचं तरी भलं करायला जाल तर तुम्हीच संकटात सापडण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. 

मीन - आज एखाद्या मोठ्या कार्यक्रमात भाग घ्याल. मित्र आणि आप्तेष्टांना भेटून आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळेल. पत्नी आणि मुलांकडून लाभ होईल. अचानक आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस खरीददारी करण्यासाठी उत्तम आहे. गुंतवणूक करण्याची घाई करू नका. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group