मेष - उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे, गुड न्यूज मिळेल. आज तुम्हाला तुमच्या धाकट्या भावाकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या जोडीदारासोबतचे झालेला वाद मिटवा, घरात शांतता नांदेल. व्यवसायातून जास्त नफा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या भावंडांची मदत घेऊ शकता. मित्रांच्या मदतीने तुमची कठीण कामं सोपी होतील. महिलांना घरगुती वस्तूंची खरेदी करावी लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल. कलाकारांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.
वृषभ - या राशीच्या आर्किटेक्टसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. शेतकऱ्यांना आज काही फायदे मिळू शकतात. त्यांना त्यांच्या पिकांच्या विक्रीसाठी जमीनदाराकडून इच्छित रक्कम मिळू शकते. आज तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुम्ही नवीन निर्णय घेऊ शकता. तुमचा व्यापार आणि नोकरी चांगली चालेल. वडिलांच्या कामात तुमची मदत खूप महत्त्वाची ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्याशी ईर्ष्या करू शकतात. पण सहकाऱ्यांकडून तुम्हाला आनंदही मिळेल.
मिथुन - आज तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल. त्यांचे आशीर्वाद संध्याकाळपर्यंत तुमच्या मनावर नक्कीच परिणाम करतील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांशी त्याबद्दल चर्चा करू शकता. तुमच्या मनात काही असेल तर ते व्यक्त करा. प्रगतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबद्दल अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. प्रॉपर्टी खरेदीसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. पैसे घेताना किंवा देताना काळजी घ्या. तुम्ही तुमच्या कमाईतून काही पैसे भविष्यासाठी वाचवू शकता.
कर्क - आज एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर होतील. तुम्ही एखाद्या मित्राला मदत कराल जे भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जर तुम्ही अलीकडेच एखादा प्रकल्प सुरू केला असेल तर आज त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. आज तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक नवीन आकर्षण दिसेल. तुमच्या हुशारीने आणि समजूतदारपणाने तुम्ही तुमची कामं व्यवस्थित पूर्ण कराल. व्यवसायात अचानक काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. अधिकाऱ्यांसमोर तुमचं म्हणणं मांडण्यासाठी हा योग्य वेळ आहे. पैशांच्या बाबतीत तुम्हाला यश मिळेल.
सिंह - तुम्ही ज्या संधीची वाट पाहत आहात ती आज प्रत्यक्षात येईल. ऑफिसमधील प्रलंबित कामे तुमच्या वरिष्ठांच्या मदतीने पूर्ण होतील. तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते. आज कोणाच्याही बोलण्याने मनाला लावून घेऊ नका. नोकरी करणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. व्यवसायात तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. कामासाठी केलेले तुमचे प्रयत्न तुम्हाला चांगले यश देतील. वडीलधाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या लग्नाची बोलणी पुढे सरकतील. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काही गोष्टी शेअर करू शकता.
कन्या - आज नशीब तुमच्या बाजूने असेल. इतरांशी बोलणे आणि व्यवसायात सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. आज आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल. या राशीच्या अविवाहितांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कपड्यांच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. सासरच्या लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. नोकरीत तुम्हाला यश मिळेल. जबाबदारीच्या कामात कोणतीही हयगय करू नका. अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी शिफारस घ्यावी लागू शकते. जर तुम्ही विमा किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.
तुळ - आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुम्ही सहलीची योजना देखील आखू शकता. यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती वाढेल. आज तुम्ही तुमच्या गोड भाषेने इतरांना तुमचे काम करून देण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्हाला कामात चांगले संधी मिळतील. तुमच्या कौटुंबिक व्यवसायात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं ऐकावं लागू शकतं. व्यापाऱ्यांना सरकारी नियमांमुळे थोडी अडचण येऊ शकते. सोशल मीडियामुळे तुमचा एखादा नवीन मित्र बनेल.
वृश्चिक - आज तुम्हाला एखाद्या अज्ञात स्रोताकडून पैसे मिळू शकतात. नवीन प्रोजेक्टवर काम केल्याने तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तरुणांसाठी उच्च शिक्षणाचे चांगले योग आहेत. तुम्ही आई-वडिलांसोबत खरेदीसाठी जाऊ शकता. महत्त्वाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. तुम्ही आज एखादी कविता किंवा कथा लिहू शकता. जर विवाहित जोडप्यांनी आज त्यांच्या जोडीदारासाठी जास्त वेळ दिला तर त्यांच्या नात्यात गोडवा वाढेल. तुम्ही संध्याकाळी एकत्र एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा विचार देखील करू शकता. जास्त कामामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.
धनु - आज तुमच्या सकारात्मक विचारांमुळे तुमचे कुटुंबीय आनंदी होतील. नोकरीमध्ये बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा फायद्याचा काळ आहे. पूर्वी रखडलेले प्रॉपर्टीचे व्यवहार आता फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून समाधान मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या नावाने केलेल्या कामात तुम्हाला फायदा होईल. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांसाठी मोठी संधी आहे. आज वागणं लवचिक ठेवा आणि इतर लोकं काय म्हणतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुमच्या व्यवहारी वागण्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला आदर मिळू शकेल.
मकर - आज तुमची अनेक कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. तुमच्या वेळेचा सदुपयोग केल्याने तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्ही मदत कराल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. आज तुमचे कोणाशी मतभेद होऊ शकतात. इतरांवर विश्वास न ठेवणेच चांगले. महिलांना आज अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. नव्या जमीन खरेदीचा विचार असेल तर आजचा दिवस उत्तम ठरेल.
कुंभ - आज तुम्ही केलेल्या कामांमुळे खूप आनंदी असाल. एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या वागण्यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे सभोवतालच्या लोकांना आनंद होईल आणि तुमची चांगली प्रतिमा उजळेल.
मीन - आज तुमचे मन नवीन कामांमध्ये लागेल. तुम्ही तुमच्या पराक्रमाने आणि धैर्याने पैसे कमवू शकाल. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळेल. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसेल. भूतकाळातील घटनांमुळे फक्त वाद निर्माण होऊ शकतो. अनावश्यक समस्यांवर तुमचे नियंत्रण असेल. आज तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांमधील नातेसंबंध मजबूत होतील. या राशीच्या प्रेमींसाठी आजचा दिवस चांगला आहे.