आजचे राशिभविष्य २९ डिसेंबर २०२५ : तणाव की आनंद ? तुमच्या राशीत आज काय ? वाचा
आजचे राशिभविष्य २९ डिसेंबर २०२५ : तणाव की आनंद ? तुमच्या राशीत आज काय ? वाचा
img
वैष्णवी सांगळे
मेष राशी - प्रगतीचा आणि आर्थिक लाभाचा ठरेल. आज तुम्ही भविष्यात गुंतवणूक करण्याची योजना अंतिम करू शकता. घरात तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील. विरोधक तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू शकतात. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यकपणे जाणे टाळा. तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम यशस्वी होईल..

वृषभ राशी - आजचा दिवस अत्यंत उत्साही असणार आहे. तुम्ही नवीन उपक्रम किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी पावले उचलल्यास त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून तुम्हाला भावनिक आणि व्यावहारिक पाठिंबा मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही एखाद्या सहलीचे नियोजन करु शकता. आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल, जी तुमच्या करिअरमध्ये नफ्याचे नवीन मार्ग उघडण्यास मदत करेल.

मिथुन राशी - आजचा दिवस मानसिक शांतता देणारा ठरेल. तुमचे मन प्रसन्न असल्याने तुम्ही कठीण कामेही सहजपणे पूर्ण करु शकाल. प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या योजनेवर विचार करताना खूप सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व स्थापित होईल. मुलांच्या भविष्याबद्दल तुम्ही चिंतित असाल. फिरण्यासाठी आज तुम्ही घराबाहेर पडाल ज्यामुळे तुमचे भरपूर मनोरंजन होईल.

कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी निर्णायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही काही कठोर किंवा मोठे निर्णय घ्याल, ज्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दीर्घकाळ मिळत राहतील. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्ही प्रगती कराल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. व्यापाऱ्यांनी कायदेशीर अडचणींपासून दूर राहावे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आजचा दिवस आरोग्यासाठीही उत्तम आहे.

सिंह राशी - सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. व्यवसायाच्या दृष्टीने एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट भविष्यात मोठा आर्थिक फायदा मिळवून देणारी ठरेल. आज व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. जीवनसाथीसोबत आयुष्यातील एक उत्तम अनुभव मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांकडून सुख आणि सहकार्य मिळेल.

कन्या राशी - कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस काहीसा तणावपूर्ण राहू शकतो. मनामध्ये अज्ञात भीती आणि अस्वस्थता जाणवेल, ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने धावपळ होऊ शकते. व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या, अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागेल. जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता असल्याने मनावर ताबा ठेवा. वाद टाळा.

तूळ राशी - तूळ राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या. कामानिमित्त एखादा लांबचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. जो थकवा देणारा ठरेल. काही विशिष्ट कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या विरोधकांशी तडजोड करावी लागेल. व्यवसायात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्यास सुरुवात होईल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. तुम्हाला सर्वांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

वृश्चिक राशी - आजचा दिवस भावनिक आव्हानांचा असेल. जवळच्या व्यक्तीच्या किंवा विशेषतः पालकांच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे तुमची चिंता वाढू शकते. व्यवसायात तुमच्या भागीदाराकडून मिळालेला सल्ला आणि पाठिंबा तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल. एखादा मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प तुम्ही आज हाती घ्याल. ज्यामध्ये निश्चित यश मिळेल. मात्र, कामाच्या ठिकाणी होणारे अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि रागावर संयम ठेवावा लागेल.

धनु राशी - आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आज यशस्वीपणे पूर्ण होतील. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जुन्या मित्राची भेट झाल्याने आठवणींना उजाळा मिळेल आणि मन प्रसन्न होईल. नवीन प्रकल्प किंवा नोकरीत बदल करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबात लग्नाचे बोलणे पुढे सरकू शकते. जोडीदाराकडून तुम्हाला भरभरून प्रेम आणि सहकार्य मिळेल.

मकर राशी - आजचा दिवस शारीरिक कष्टाचा आणि धावपळीचा असेल. नवीन कामाची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत आणि वेळ द्यावा लागेल. तुमचे सहकारी तुमच्या कामाच्या पद्धतीवर खुश असतील. तुम्हाला सहकार्य करतील. आर्थिक चणचण भासल्यास मित्रांकडून वेळेवर मदत मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये नवीन पाहुण्याचे किंवा चिमुकल्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाची लाट येईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील.

कुंभ राशी - आजचा दिवस भाग्याचा ठरेल. तुमची जी कामे गेल्या अनेक दिवसांपासून थांबली होती, ती आज पूर्णत्वास जातील. व्यवसायात तुम्हाला एखाद्या मोठ्या कराराची किंवा भागीदारीची संधी मिळू शकते, जी प्रगतीसाठी महत्त्वाची ठरेल. मात्र, वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना पूर्ण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवू शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. वेळेवर औषधे घ्या.

मीन राशी - आजचा दिवस थोडा कठीण जाऊ शकतो. आज तुम्ही असे काहीतरी करू शकता ज्याचा तुम्ही पूर्वी कधी विचार केला नसेल. दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा थोडे चांगले राहील. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. आईसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी उत्तम राहील. आज तुम्हाला नवीन काम मिळू शकते. आज व्यवसायात वाढीचे योग आहेत आणि आरोग्य साधारणपणे चांगले राहील.


इतर बातम्या
Join Whatsapp Group