आजचे राशिभविष्य १९ डिसेंबर २०२५ : पगारवाढ की नोकरीत स्थलांतर ; तुमच्या राशीत आज काय ?
आजचे राशिभविष्य १९ डिसेंबर २०२५ : पगारवाढ की नोकरीत स्थलांतर ; तुमच्या राशीत आज काय ?
img
वैष्णवी सांगळे
मेष - आज तुम्हाला तुमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील तरच तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. आज तुमच्या धाकट्या भाऊ बहिणींसोबतच्या नात्यात गोडवा राहील. कुटुंबात काही वाद सुरू असतील तर तेही आज संपुष्टात येतील.आज तुम्हाला तुमच्या मुलाकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्ही जे काम धैर्याने पूर्ण कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.  आज तुमच्या व्यवसाय योजनेत बदल करणे महत्वाचे आहे. नोकरी करणाऱ्यांना लवकरच स्थलांतर करावे लागू शकते.

वृषभ - आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. आज तुमच्या घरात एखाद्या शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने सहभागी होतील. आज तुम्हाला काही गुप्त स्त्रोतांकडून पैसे देखील मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.आज तुम्हाला नवीन घर, वाहन इत्यादी घ्यायचे असेल तर त्यासाठीही दिवस चांगला राहील. आज तुमच्यावर कामाचा मोठा ताण असेल, त्यामुळे तुम्हाला आळस दूर करावा लागेल. अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी हानिकारक असू शकतो, ज्यामुळे तुमच्या कौटुंबिक नातेसंबंधांना धोका निर्माण होऊ शकतो. लोकांशी नीट वागा, नम्रतेने बोला.

मिथुन - नोकरीत तुम्हाला पगारवाढीसारखी चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते. तसेच आज तुमचा पगार देखील होऊ शकतो. तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या. तब्बेत बिघडल्यास वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. सट्टेबाजी किंवा जुगारात पैसे गुंतवणाऱ्या लोकांनी आज गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करावा अन्यथा त्यांना आपले पैसे गमवावे लागू शकतात. कुटुंबातील मालमत्तेशी संबंधित समस्या आज सोडवली जाऊ शकते आणि तुम्हाला वरिष्ठांकडूनही मदत मिळेल. आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढल्यामुळे ताण येऊ शकतो.

कर्क - जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याची योजना आखत असाल, तर त्यावर कृती करण्यासाठी आज अनुकूल काळ आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या सल्ल्याने आणि मदतीने तुम्ही नवीन यश मिळवू शकता. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुमच्या मुलाच्या शिक्षणाशी संबंधित निकाल मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. व्यापारी वर्गाला आज पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे ते चिंतेत राहतील. जोडीदारासोबत आज कोणत्याही जुन्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा अन्यथा वाद होऊ शकतो.  आज संध्याकाळी तुम्ही कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

सिंह - आजचा दिवस धावपळीचा आणि कठोर परिश्रमाचा असेल, परंतु कामातील यश तुमचा थकवा कमी करेल. गरजू मित्राला मदत केल्याने समाधान मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाण्याचा विचार करू शकता. मात्र बाहेर जाताना आपले पैसे आणि सामान सांभाळा चोरी होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा आणि सुखसोयी पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करू शकता. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांनी अद्याप त्यांच्या जोडीदाराची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून दिली नसेल, तर ते आज त्यांची ओळख करून देऊ शकतात. 

कन्या - आज भावनेच्या भरात महत्त्वाचे निर्णय घेऊ नका, नंतर पस्तावाल. पालकांनी त्यांच्या मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत, कारण जास्त नियंत्रणामुळे त्यांचा आत्मविश्वास कमकुवत होऊ शकतो. आज तुमचे रखडलेले पैसे मिळतील. तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकासाठी पैशांची व्यवस्था देखील करावी लागेल. आज अचानक तुमच्या नातेवाईकाच्या तब्येतीची बातमी ऐकून तुम्हाला प्रवास करायला लागू शकतो. आज तुम्ही संध्याकाळचा वेळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्यासाठी काही योजना बनवण्यात घालवाल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या भावांचा सल्ला नक्कीच घ्यावा लागेल

तुळ - आज ऑफिसमध्ये तुमचा कामाचा ताण वाढू शकतो, परंतु तुमचे काम तुमच्या बॉसला प्रभावित करेल. आळसामुळे महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका, नंतर वाढू शकतात अडचणी. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप यशस्वी असेल. आज तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार कराल मात्र ही वेळ त्यासाठी योग्य नाही थोडी वाट पहावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल अन्यथा भविष्यात आरोग्याच्या काही समस्या तुमच्यावर परिणाम करू शकतात.  आज प्रेमसंबंधातील लोकांमध्ये नवीन एनर्जी असेल. तसेच काहीजणांना बाळाची गुड न्यूज मिळू शकते.

वृश्चिक - आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. तुमचे लक्ष तुमच्या कामात सुधारणा करण्यावर असेल. मुले त्यांच्या पालकांकडे अधिक लक्ष देतील आणि त्यांचे ऐकतील. महत्वाचं काम झाल्याने मनावरचं ओझ उतरेल, समाधान मिळेल. आजचा दिवस तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढवणारा असेल. परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. आज जोडीदाराची तब्बेत बिघडू शकते. विद्यार्थी आज स्पर्धेच्या तयारीत व्यस्त दिसतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतील. संध्याकाळपर्यंत तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे तुमचा मानसिक ताण काही प्रमाणात कमी होईल. राजकारणातील लोकांना आज काही चांगल्या संधी मिळतील ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल होईल.

धनु -  जर तुम्ही मालमत्तेच्या समस्येला तोंड देत असाल तर आज निकाल तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. आज जर तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या मुलासाठी एफडी मध्ये गुंतवायचे असतील तर तुम्ही ते गुंतवू शकता. भविष्यात ते पैसे त्याच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील. तुमच्या वडिलांना डोळ्यांशी संबंधित काही समस्या असल्यास त्यांना आज त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल. परीक्षेत अपेक्षित निकाल मिळाल्याने विद्यार्थी आज आनंदी राहतील. आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल.

मकर - आज तुम्हाला काही नवीन अनुभव मिळू शकतात. कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जास्त वेळ घालवू शकत नाही. आज तुम्ही कोणतेही काम करताना चुकीचा निर्णय घेणार नाही किंवा कोणाच्यातरी सांगण्याने चुकीचे काम करणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप करावा लागू शकतो. आज तुमची प्रगती पाहून तुमच्या शत्रूंनाही तुमचा हेवा वाटेल. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला पुढे जावे. तुमच्यावर कर्ज असेल तर आज तुम्ही ते फेडण्यात यशस्वी व्हाल. इच्छित लाभ मिळाल्यानंतर आज तुम्हाला आनंद वाटेल.

कुंभ -  आज, तुमच्या सभोवतालच्या लोकांशी सकारात्मक, प्रेमाने वागा. आज तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता, ज्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही आनंदी होतील. कुटुंबासोबत वेळ घालवून समाधान मिळेल. आज तुम्ही जे कोणते काम कराल ते पूर्ण आत्मविश्वासाने कराल आणि त्यात तुम्हाला नक्कीच भरपूर पैसे मिळतील. जर तुम्ही लग्नासाठी इच्छुक असाल तर तुमच्या नातेवाईकाकडून तुमच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव येईल मात्र तो स्वीकारण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्या. जोडीदारासोबतच्या नात्यात आज गोडवा राहील. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून निराशाजनक बातम्या ऐकू येतील ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. जर तुम्ही आज कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात कर्ज घेऊ नका कारण ते फेडणे तुमच्यासाठी कठीण होईल.

मीन - आज तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे तुमची सकारात्मकता वाढेल. तुमचा आदर आणि सन्मान वाढेल. आज काही आव्हाने येऊ शकतात, प्रतिकूल परिस्थितीत डगमगून जाऊ नका. शांतपणे निर्णय घ्या. जर तुम्ही आज घर किंवा रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी तुमचे पैसे गुंतवले तर त्यासाठी हा चांगला काळ असेल. त्यामुळे विश्वासाने गुंतवणूक करा. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याशी तणाव सुरू असेल तर तोही आज संपेल. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील एखादी समस्या सोडवण्यासाठी तुमच्या भावाचा सल्ला घ्यावा. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या सासरच्या मंडळींना भेटायला जाऊ शकता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group