मेष - व्यवसाय करणाऱ्यांनी आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी इतरांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या योजनांमध्ये शेवटच्या क्षणी बदल देखील होऊ शकता. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील पण तुम्ही तुमच्या वरिष्ठ लोकांच्या मदतीने त्या दूर करू शकाल. आज तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता त्यामुळे सावधान राहा. तुम्ही तुमच्या सकारात्मक विचारांचा फायदा घ्याल. तुम्हाला तुमच्या मामाच्या घरून आर्थिक मदत मिळू शकते. बजेट वर लक्ष ठेवा, नाहीतर नंतर त्रास होऊ शकतो. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात.
वृषभ - बिझनेस करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी नवीन मार्गांनी फायदा होईल त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. घरात काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. तुम्हाला स्टेबल वाटेल. आरोग्याची काळजी घ्या. काही महत्वाच्या कामांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे ते वेळेत पूर्ण करा. सरकारी कामात तुम्हाला फायदा होईल. आज तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारल्याने निश्चिंत वाटेल.
मिथुन - आज तुमचे मित्राशी मतभेद होऊ शकतात. इतरांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता खात्री करून घ्या मगच निर्णय घ्या. महिलांना आज अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही नवीन जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्यासारखा चांगला दिवस नाही. खर्च वाढू नये म्हणून लक्ष ठेवा, नाहीतर अडचणी येऊ शकतात. तुमच्या काही चुकांमधून शिका. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. बिझनेसच्या कामासाठी तुम्ही लांबचा प्रवास करू शकता. घरातील मोठ्या माणसांशी वाद घालू नका. त्यांनी घाईत निर्णय घेतल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो.
कर्क - आजचा दिवस तुमच्यासाठी ठीक आहे. जे लोक व्यापार करतात, त्यांना थोडा कमी फायदा होईल. पण त्यांनी ठरवलेल्या जुन्या योजनांमधून त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो. त्यामुळे त्यांचा रोजचा खर्च भागेल. तुम्ही सगळ्या कामांमध्ये चांगले दिसणार आहात. ऑफिसमध्ये तुमच्या योग्यतेनुसार काम मिळालं, तर तुम्हाला खूप आनंद होईल. आज, अचानक पैसे मिळतील, ज्यामुळे आर्थिक गुंतवणूक वाढेल, परिस्थिती चांगली राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल. तुम्ही त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाल, ज्यामुळे त्यांना खरोखर बरं वाटेल.
सिंह - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम देईल. घरात कोणाच्या लग्नाचा विषय निघू शकतो, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही तुमच्या परंपरा आणि मूल्यांना जपण्याचा प्रयत्न कराल. काही नवीन लोकांशी संबंध सुधारण्यात यशस्वी व्हाल. कोणतही काम आत्मविश्वासाने करा तेव्हाच ते पूर्ण होईल. या राशीच्या व्यवसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असेल, कारण व्यवसायातील व्यवहार तुमच्या बाजूने होतील. आज एखादा जवळचा मित्र अचानक तुमच्या घरी येऊ शकतो. तुम्ही एकत्र फिरायला जाण्याचा प्लान आखू शकता, समाधान वाटेल.
कन्या - आज तुम्ही कलात्मक गोष्टींमध्ये जास्त लक्ष द्याल. तुमचे सहकारी तुम्हाला पाहून आश्चर्यचकित होतील. तुम्ही मोठ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराल. जर तुम्ही कोणाला वचन दिलं असेल तर ते पूर्ण कराल. आज तुम्ही काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवा. तुमच्यातील कलात्मक कौशल्ये सुधारतील. बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या जुन्या योजनांमधून चांगला नफा मिळू शकतो. या राशीच्या बेरोजगार लोकांना चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्हाला अनेक दिवसांपासून कामात अडचणी येत असतील तर आज सुटका होईल.
तुळ - आज कोणतंही पाऊल काळजीपूर्वक उचला, विचार करून निर्णय घ्या. निर्णय घेतानाता हृदयापेक्षा डोक्याचा जास्त वापर करा. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांची बदली अशा ठिकाणी होईल जिथे प्रवास करणे सोपे होईल. आज तुमच्या सुखसोयी वाढतील. नवीन गाडी घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही सगळ्यांच्या गरजा पूर्ण कराल. काही महत्त्वाची कामं लवकर करावी लागतील तेव्हाच ती पूर्ण होतील. घरातील समस्या इतरांना सांगू नका नाहीतर ते लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या मुलांना काही कामं दिली तर ते व्यवस्थित पार पाडतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणीतून आराम मिळेल.
वृश्चिक - या राशीखाली जन्मलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हा दिवस नातेवाईकांसोबतच्या नातेसंबंधांना ताजेतवाने करण्याचा देखील आहे. प्रेमाच्या जोडीदारांचा आजचा दिवस रोमँटिक असण्याची शक्यता आहे. ऑफीसमध्ये मशीन बिघडल्याने काम वाढू शकतं.आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये मोठं पद मिळाल्याने तुम्ही खुश व्हाल. काही वादविवाद आणि चर्चांमध्ये भाग घ्याल. सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन चांगला नफा कमवाल. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते.
धनु - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही नवीन योजनांचा फायदा घ्याल. ऑफिसमध्ये विचार न करता कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमचं रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकतं. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तुम्ही तुमच्या आईला मामाच्या घरी समजूत काढायला घेऊन जाऊ शकता. आज केलेल्या गुंतवणुकीमुळे तुमच्या समृद्धी आणि आर्थिक परिस्थितीला फायदा होईल. काही गोष्टींमुळे तुमच्या कामाच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. संयमाने, धीराने वागा. प्रश्न नक्की सुटतील. भविष्यात त्रासदायक ठरतील अशा लोकांशी जास्त संपर्क ठेवणं टाळा.
मकर - आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कोणाकडून पैसे उधार घेऊ नका. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी आपल्या बॉस सोबत वाद घालू नये, नाहीतर त्रास होऊ शकतो. बिझनेसचे निर्णय विचारपूर्वक घ्या. पैशांच्या बाबतीत अनोळखी व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि त्यांना आनंद होईल. आज तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकता, जे तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्याच्यावर तुम्ही नेहमीच विश्वास ठेवला होता तो खरोखर विश्वासार्ह नाही हे जाणून तुम्हाला खूप दुःख होईल.
कुंभ - आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तब्येतीसाठी दिवस थोडा कठीण आहे. तुमच्या कामांची एक लिस्ट तयार करा. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्या वाढू शकतात आणि मोठ्या आजारात रूपांतर होऊ शकतं. कोणताही करार करताना विचारपूर्वक सही करा. कामाच्या दरम्यान टेन्शन घेऊ नका. रिस्क असलेले काम करू नका. नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सावधान राहा. जर तुमच्या मुलाने परीक्षेत चांगली कामगिरी केली नाही, तर त्यांना फटकारू नका, तर पुढच्या वेळी त्यांना चांगले काम करण्यास प्रोत्साहित करा. मित्र आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवणे देखील शक्य आहे.
मीन - आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जमीन किंवा बांधकाम संबंधित कामात सावधान राहा. व्यापारात योजना जपून पुढे न्या. घरात काहीतरी चांगलं घडेल ज्यामुळे आनंद येईल. सगळ्यांचा मान ठेवा नाहीतर अडचण येऊ शकते. एका ध्येयावर लक्ष ठेवले, तरच काम पूर्ण होईल. तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता वाढेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले ऑफिसमधील काम आज पूर्ण होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना हा दिवस चांगला जाईल; ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. त्यांना मित्रांसोबत मनोरंजक खेळ खेळण्याचा आनंदही मिळेल.