आजचे राशिभविष्य ११ फेब्रुवारी २०२६ :  तुमच्या राशीत आज काय खास ? वाचा
आजचे राशिभविष्य ११ फेब्रुवारी २०२६ : तुमच्या राशीत आज काय खास ? वाचा
img
वैष्णवी सांगळे
मेष - आज कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून योग्य ती मदत आणि मानसन्मान मिळेल. संध्याकाळी नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात सतर्क रहा. लेखकांसाठी आजचा दिवस उत्तम जाईल.

वृषभ - आज लोक तुमच्या संयम आणि नम्रतेने प्रभावित होतील. मित्रांसोबत जुन्या समस्यांवर चर्चा केल्याने चांगला उपाय मिळू शकेल. तुमच्या सल्ल्याने इतरांना फायदा होईल. आज तुम्हाला कमाईचे नवीन स्रोत सापडू शकतात. मुलांकडून तुम्हाला एखादी सुखद बातमी मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम संध्याकाळ पर्यंत पूर्ण होईल.

मिथुन - आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही एक संपूर्ण योजना बनवा आणि तुमच्या पालकांचा सल्ला घ्या. सरकारी धोरणे आणि नियमांकडे बारकाईने लक्ष दिल्यास तुमचे काम सोपे होईल.सासरकडून तुम्हाला अचानक धनलाभ मिळू शकतो ज्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. 

कर्क - राजकीय क्षेत्रात केलेले प्रयत्न आज यशस्वी होतील. सत्ता व शासनाशी जोडण्याचा देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज तुम्ही जुने कर्ज फेडू शकता. आज तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्यात तुम्हाला बरेच यश मिळू शकेल; संयम आणि समजूतदारपणा दाखवा. घरातल्या कामासाठी बराच पैसा खर्च होईल. नव्या गोष्टी शिकल्याने फायदा होईल.

सिंह - अपूर्ण कागदपत्रांमुळे तुमचे न्यायालयीन खटले काही काळासाठी लांबू शकतात, परंतु वेळेत सर्व काही ठीक होईल. आज तुम्ही हाती घेतलेला कोणताही व्यवसाय यशस्वी होईल. तुम्हाला मित्राकडूनही पाठिंबा मिळेल. आज तुमच्या आरोग्यात बाधा येऊ शकते. तब्बेतीची काळजी घ्या अन्यथा त्रास होईल. अचानक एखादी प्रतिकूल बातमी मिळाल्याने तुम्हाला तातडीने प्रवास करावा लागू शकतो.

कन्या - कन्या राशीच्या लोकांना आज सावध रहावे लागेल तुमची मौल्यवान वस्तू हरवू किंवा चोरी होऊ शकते. तुम्ही इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा, नाहीतर महागात पडेल. जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दलची सर्व माहिती आधी गोळा करा. आज तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, ज्या तुम्ही पूर्ण कराल.

तुळ - आज काही धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. कोणत्याही विषयावर इतरांशी बोलणे किंवा सल्लामसलत करणे फायदेशीर ठरेल. तुम्हीमहत्त्वाच्या कामांचा आणि नातेसंबंधांचा विचार कराल आणि त्यांचे नियोजन कराल. घरातील मोठी अडचण सोडवली जाईल, सुटकेचा निश्वास टाकाल. आज गुड न्यूज  मिळेल.

वृश्चिक - आज दैनंदिन कामांमध्ये जास्त वेळ लागू शकतो. व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी तुमच्या वडिलांचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. तुमचे वडील त्यांच्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. आज अंगावर नवीन जबाबदाऱ्या पडतील. बिझनेसमध्ये चांगला प्रॉफिट होईल. उपजीविकेची नवीन साधने मिळतील. नोकरीत तुमची प्रतिष्ठा वाढेल. 

धनु - आज तुम्ही जे काही काम सुरू कराल ते वेळेवर पूर्ण होईल. तुम्हाला करिअरच्या नवीन संधी मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्या मोठ्या भावाकडून तुम्हाला मदत मिळेल. आज मार्केटिंग समजून घेण्यासाठी कॉमर्स विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांची मदत घेतील. भविष्यात ते खूप उपयोगी पडेल.

मकर - आज, घरातील वडीलधाऱ्यांच्या मदतीने, तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. तुमचा जोडीदार तुम्ही जे काही बोलता ते समजून घेण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात ताजेपणा येईल.

कुंभ - तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत तुमची प्रतिष्ठा सुधारेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. लहान मुले आज खूप आनंदी असतील, नवीन उपक्रमांचा शोध घेतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील.  मित्रांसोबत संध्याकाळसाठी उत्कृष्ट वेळ घालवाल.

मीन - महत्वाच्या मुद्यावर कुटुंबासमोर तुमचे मत व्यक्त करण्याची तुम्हाला भरपूर संधी मिळेल आणि तुमच्या योजना इतरांना खूप प्रभावित करतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. तुम्ही आज मनानुसार तुमचे घर सजवाल, थोडा खर्च होईल, पण अंतिम रिझल्ट उत्तम असेल. तुमच्या बोलण्यात संयम ठेवावा.
इतर बातम्या
Join Whatsapp Group