मेष - आज तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या समस्येतून आराम मिळेल आणि तुमच्या बुद्धिमत्तेची आणि क्षमतेची प्रशंसा होईल. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे, फायदे मिळण्यासोबतच तुम्हाला उत्साह आणि ऊर्जा देखील जाणवेल. जर तुम्हाला जमीन, वाहन, घर खरेदी करायचे असेल तर ते स्वप्न आज पूर्ण होऊ शकते. त्यासाठी दिवस चांगला असेल.आज तुम्हाला कोणत्याही आरोग्य समस्येपासून आराम मिळेल, तुम्ही उत्साही वाटाल.
वृषभ - आज तुम्ही तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवण्यासाठी वेळापत्रक बनवाल आणि त्यानुसार काम केल्यास तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आज तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. सध्याच्या वातावरणात तुम्ही बनवलेल्या नवीन धोरणांमुळे तुमच्या अनेक समस्या सुटतील. जर तुम्ही शेअर बाजार इत्यादीमध्ये कोणतीही गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला दुप्पट रक्कम मिळू शकते त्यामुळे तुम्हाला आनंद होईल.
मिथुन -आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुमचे व्यावसायिक व्यवहार सुरळीत सुरू राहतील. आज तुम्ही कोणत्याही कामासाठी केलेल्या मेहनतीचे अनुकूल परिणाम तुम्हाला मिळतील. आज जर तुम्ही कोणत्याही नवीन गुंतवणुकीची योजना आखली तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. आज घरात एका छोट्या पाहुण्याच्या आगमनाची आनंदाची बातमी मिळाल्याने घरात सेलिब्रेशनचे वातावरण असेल.
कर्क - विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कठीण असेल. आज अभ्यासात प्रश्न पडतील त्यामुळे त्यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची आवश्यकता त्यांना लागेल. आज तुम्ही नवीन काम सुरू करण्यास खूप उत्साहित असाल. आज तुमची काही समस्या दूर होईल आणि तुम्ही पुन्हा आत्मविश्वास आणि उर्जेने तुमचे काम सुरू कराल.
सिंह - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज व्यवसायात खूप जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण असेल, परंतु सहकाऱ्यांच्या मदतीने सर्वकाही हाताळले जाईल. आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, घरात धावपळ असेल. नोकरीतील एखाद्या सहकाऱ्याकडून जर आज तुमचे नुकसान झाले तर तुम्ही त्याच्यावर न चिडता त्याला माफ कराल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्वाकांक्षा पूर्ण कराल
कन्या - आज तुम्हाला एखाद्या कायदेशीर समस्येवर तोडगा मिळेल, ज्यामुळे तुमच्या मनावरील ओझे हलके होईल. आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्ती किंवा राजकारण्याला भेटण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षेत अनुकूल निकाल मिळाल्यानंतर या राशीच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कठीण असेल. आज अभ्यासात प्रश्न पडतील त्यामुळे त्यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची आवश्यकता त्यांना लागेल.
तुळ - आजचा दिवस तुमच्यासाठी सुवर्ण दिवस असणार आहे. आज तुम्ही व्यवसायात चांगले पैसे कमवाल आणि तुमचे व्यावसायिक संबंधही मजबूत होतील. जर तुमचे कोणतेही सरकारी किंवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल तर आज त्यात यश मिळण्याची चांगली शक्यता आहे. तुमच्या पालकांच्या आशीर्वादाने तुम्हाला भेटवस्तू इत्यादी मिळू शकतात.
वृश्चिक - आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रित असेल. काही कार्यक्रमांमुळे खर्च थोडा जास्त होईल. आज तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारात अधिक सकारात्मकता आणण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील अनेक समस्या सोडवू शकाल.आज तुमचे दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल.
धनु - आज तुम्ही तुमच्या करिअर आणि अभ्यासाबाबत सतर्क राहाल. मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल, तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
मकर - आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. आज तुम्ही तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्या कुटुंबाची मदत घेऊ शकता, यामुळे तुम्हाला धैर्य मिळेल. आजचा दिवस कौटुंबिक आनंदात वाढ करेल. जर कोणत्याही कारणास्तव काही गोंधळ झाला असेल तर तोही आज दूर होईल.
कुंभ - आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात दुप्पट नफा मिळवण्याची उत्तम संधी मिळेल आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील. आज तुम्हाला विमा आणि कमिशन व्यवसायात विशेष यश मिळेल
मीन - आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. जर तुम्ही आज पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस शुभ आहे. येणाऱ्या काळात ही गुंतवणूक चांगले फायदे देईल. आज तुम्ही सर्व महत्त्वाची कामे सहजपणे पूर्ण कराल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तुमच्या पालकांचा आशीर्वाद घेऊन तसेच तुमच्या भावंडांच्या सल्ल्यानेच पुढे जा. आज जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने एखादे काम केले तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.