मेष - मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा आणि धाडसाचा आहे. कामानिमित्त लांबचे प्रवास संभवतात. हे प्रवास फलदायी ठरतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक घटना घेऊन येणारा आहे. वाहने आणि द्रुतगती प्रवासाची विशेष आवड राहील. व्यवसायात मंदीमुळे त्रस्त असाल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद कोर्टात चालू असेल तर तुम्हाला विजय मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ - वृषभ राशीसाठी आज अचानक धनलाभाचे योग जुळून येतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल, पण आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला लगेच मिळेलच असे नाही, त्यामुळे धीर धरा आणि आपले काम सातत्याने सुरू ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. मोठं यश मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील.अडकलेले पैसे मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल.
मिथुन - मिथुन राशीच्या व्यक्तींना आज जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. कामाच्या बाबतीत आज समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.कोणतेही काम घाईत करू नका. जबाबदारीने काम करणे तुमच्यासाठी चांगले राहील. कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहा ते तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. गुंतवणुकीच्या योजना बंद पडण्याची शक्यता आहे.
कर्क - कर्क राशीसाठी आजचा दिवस मनाशी निगडित असेल. काही वेळेला मन उदास वाटू शकते. त्यामुळे आज शक्यतो कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे. दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण ते रखडण्याची शक्यता आहे. मनःशांतीसाठी ध्यान करणे फायदेशीर ठरेल.काही प्रभावशाली लोकांशी तुमची भेट होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन योजना सुरू करू शकता. तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल.
सिंह - सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मुलामुलींच्या प्रश्नांना मार्गी लावणारा आहे. तुम्हाला यश मिळेल. मुलांशी संबंधित समस्या सुटतील आणि त्यांच्या प्रगतीने आनंद मिळेल. समाजात नवीन लोकांशी ओळख होईल. उपासनेसाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक लाभ मिळतील. कुटुंबातील लोकांचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांशी संबंध वाढवण्यात यशस्वी व्हाल.
कन्या - कन्या राशीच्या लोकांना आज उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटनांचा अनुभव येईल. तुमचे व्यक्तिमत्त्व बहरेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबीय सुद्धा तुम्हाला केलेल्या गोष्टींविषयी योग्य पात्र समजतील. एकूणच आजचा दिवस आनंदी आणि उत्साहाचा असेल.
तूळ - तूळ राशीसाठी आज नोकरी आणि व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कामे व्यवस्थित होतील. घडलेल्या गोष्टींचे योग्य अवलोकन करून पुढील कालावधीचे नियोजन आज योग्य प्रकारे केले जाईल, ज्यामुळे भविष्यातील मार्ग अधिक स्पष्ट होईल. आज तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे टाळा नाहीतर वाद होऊ शकतात. तुमची जुनी चूक लोकांसमोर येऊ शकते. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला आहे. व्यावसायिक क्षेत्रात काही मोठे आर्थिक करार होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुद्धा सुसंवाद साधून पुढे जाण्याचा योग आहे, ज्यामुळे घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील.
धनु - धनु राशीला आज मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभण्याचा दिवस आहे. तुम्हाला काय केल्याने आनंद मिळतो हे समजून घ्याल आणि त्यानुसार वागाल. सामाजिक कार्यामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्ही आत्म-चिंतन कराल आणि स्वतःला वेळ द्याल.
मकर - मकर राशीच्या व्यक्तींना आज खर्चाचे प्रमाण वाढते राहील. खर्च जपून करावा लागेल. काय चुकले आणि काय बरोबर याचा शोध घेण्यात आज तुमचा वेळ जाईल. यामुळे तुमचा अध्यात्मिक कल वाढेल. तुम्ही जीवनातील गहन सत्यांकडे आकर्षित व्हाल.
कुंभ - कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आज वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी घडतील. शनीची कृपा तुमच्यावर राहील. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात तुमचा वेळ आनंदात जाईल. त्यांच्या मदतीने तुम्ही कामातही पुढे जाल. नवीन संकल्पनांवर काम करण्यासाठी दिवस उत्तम आहे.
मीन - मीन राशीच्या व्यक्तींचा आज अध्यात्माकडे विशेष कल राहील. अनपेक्षित स्रोतातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदारासोबत प्रेम आणि समन्वय टिकून राहील. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता लाभेल