आज ११ ऑगस्ट २०२५ , आजचा वार सोमवार ; आज कोणावर राहील भगवान शिवाची कृपा , जाणून घेऊया.
आज ११ ऑगस्ट २०२५ , आजचा वार सोमवार ; आज कोणावर राहील भगवान शिवाची कृपा , जाणून घेऊया.
img
वैष्णवी सांगळे
आज 11 ऑगस्ट श्रावणातील तिसरा सोमवार असून आज भगवान शिवाची सर्वांवर कृपा राहील. तुमचा दिवस कसा असेल जाणून घेऊया. 

मेष - जोडीदाराच्या आणि मुलांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे चिंतेत रहाल.आज भावाच्या लग्नात व्यस्त असल्याने थोडी धावपळ होईल. नोकरी व्यवसायातील शत्रूंपासून आज सावध राहावे लागेल कारण ते तुमच्या कामात अडथळे आणू शकतील. आनंदाच्या भरात आज कोणालाही आश्वासन देऊ नका. 

वृषभ - आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांनाही धार्मिक स्थळी दर्शनाला घेऊन जाऊ शकता. तुमच्या जोडीदाराने जर तुमची ओळख त्याच्या कुटुंबाशी करुन दिली नसेल तर आजच्या दिवशी तुम्हाला समस्यांचा सामना करावे लागेल. ऑफिसमध्ये आवडीचे काम करायला मिळाल्याने तुम्ही आज आनंदी असाल.

मिथुन - विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल.कामात अधिक व्यस्त असल्याने तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या रागीट स्वभावामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. 

कर्क - आज तुमचे घर, दुकान इत्यादींबाबत न्यायालयात एखादे प्रकरण चालू असेल तर आज वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीने ते सोडवून तुमच्या बाजूने निर्णय होऊ शकतो.आज नोकरीत काही लोक तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यावर वेळीच लक्ष द्या अन्यथा भविष्यात तुम्हाला त्रास होईल. 

सिंह - आजचा दिवस तुमच्यासाठी खास यश मिळवणारा असेल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना आज प्रमोशन सारखी चांगली बातमी मिळू शकते. आज एखाद्या स्त्रीमुळे घरात कलह निर्माण होऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. विद्यार्थी त्यांच्या निकालाची वाट पाहत असतील तर आज तुमचा निकाल येऊ शकतो.

कन्या - आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल तसेच छोटासा नफा देखील होऊ शकतो. एखाद्या गोष्टीबाबत चिंतेत असाल तर आज त्याविषयी समस्या वाढू शकते. तणावात असाल तर कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कोणासाठी जर भेटवस्तू खरेदी करत असाल तर तुमच्या मनाला ज्यागोष्टी आवडतील त्याच घेण्याचा प्रयत्न करा.

तूळ -  आज दिवसाची सुरुवात थोडी मंदावलेली राहील. तुम्हाला अशक्त पणा जाणवू शकतो. परंतु दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे आरोग्य सुधारेल. आज तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळू शकते. प्रेमविवाहासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून संमती मिळू शकते. मात्र आज तुम्हाला काम आणि कुटुंबात समतोल राखावा लागेल.

वृश्चिक - आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल ज्यामुळे आनंद होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. मुलाला त्याच्या क्षेत्रात यश मिळेल. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर आजचा दिवस थोडा खराब जाईल. तुम्ही काही प्रभावशाली संपर्क प्रस्थापित कराल. 

धनु - आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. दुपारपर्यंत परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल राहील पण त्यानंतर बदल होईल. वैवाहिक जीवनात सुधारणा होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले क्षण घालवाल. कामाच्या ठिकाणी थोडे अधिक कष्ट करावे लागतील. सामाजिक कार्य किंवा राजकारणाशी निगडित लोकांना काही विशेष यश मिळण्याची शक्यता आहे.

मकर - आज दुपारी काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे नात्यात तणाव वाढू शकतो. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये चांगले काम कराल, ज्यामुळे तुमची नक्कीच प्रशंसा होईल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या कामाच्या ठिकाणी तुम्ही कौतुकास पात्र व्हाल. याकाळात तुमची संभाषण क्षमता मजबूत असल्याने तुम्ही लोकांवर सहज प्रभाव टाकू शकाल. 

कुंभ - आज तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकता. कुटुंबात भांडणे वाढू शकतात आणि सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे.तुम्हाला मालमत्तेशी संबंधित प्रकरणे काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या आणि इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका. वैवाहिक जीवन चांगले राहील.

मीन - नशिबाच्या कृपेने बिघडलेली कामेही पूर्ण होतील, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या प्रेम जीवनात तुमचा वेळ चांगला जाईल. उत्पन्नाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. तुमच्या बोलण्यात कटुता असली तरी व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. विरोधकांपासून सावध राहा. कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि वैवाहिक जीवन सामान्य राहील. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group