आजचे राशिभविष्य ! २५ ऑगस्ट २०२५ , आजचा वार सोमवार ;  प्रमोशन मिळणार की नाही… आज काय सांगते तुमची रास ? वाचा
आजचे राशिभविष्य ! २५ ऑगस्ट २०२५ , आजचा वार सोमवार ; प्रमोशन मिळणार की नाही… आज काय सांगते तुमची रास ? वाचा
img
वैष्णवी सांगळे
मेष: आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी लाभेल. आज एखादे प्रलंबित काम पूर्ण केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच तुम्हाला समाधान मिळेल. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात अडकलात तर भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता. भावनिक निर्णय अशावेळी घेणे टाळा. 

वृषभ: आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशया पासून दूर राहावे. जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सही करताना काळजी घ्यावी लागेल.व्यवसायात आज कोणताही निर्णय घेताना जर जोखीम पत्करली तर त्याचा भविष्यात तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. नोकरदारांनी आज कोणाशीही वाद करणे टाळावे.

मिथुन: आज कोणाशीही वाद घालणे टाळा अन्यथा कुटुंबातील एखाद्या सदस्याला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.आजचा दिवस सुखा - समाधानात जाईल. भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. दुपार नंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. आज तुमचे रखडलेले काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. 

कर्क: आजचा दिवस लाभदायी आहे. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील.आज तुम्ही तुमच्या मुलांच्या एखाद्या कृतीने चिंतेत असाल. मुलांकडून एखादी निराशाजनक बातमी देखील ऐकू येईल त्याने देखील तुम्ही अस्वस्थ व्हाल. संध्याकाळी तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. जर एखादा आजार तुम्हाला त्रास देत असेल तर नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या अन्यथा भविष्यात तोच आजार तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. 

सिंह: आज जर कुटुंबातील एखादी व्यक्ती विवाहोत्सुक असेल तर त्यांच्यासाठी आज एक चांगले स्थळ येऊ शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आजचा दिवस तुमच्या नात्यात सकारात्मक बदल घडवून आणेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नये सर्व निर्णय संयमाने घ्यावेत असे न केल्यास भविष्यात तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज एखादी चांगली संधी मिळेल. 

 हे ही वाचा
बिग बॉसच्या इतिहासातील 'ही' आहे सर्वांत महागडी स्पर्धक; 3 दिवसांचे घेतले तब्ब्ल २.५ कोटी रुपये

कन्या: भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन कामे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते आज तुम्हाला परत मिळू शकतील त्यामुळे तुम्हाला अचानक लाभ होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला फिरायला घेऊन जाऊ शकता. छोट्या व्यावसायिकांना आज आर्थिक तंगी जाणवेल. 

तूळ: आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मनात सतत विविध विचार घोंगावत राहिल्याने मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. तुम्हाला त्याच्यासाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल.आज तुमच्या मुलाला त्याच्या आवडीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्यास तुम्हाला आनंद होईल.

वृश्चिक: आज तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल कारण त्यांना वायरल आजार होऊ शकतात. त्यामुळे तब्बेत बिघडल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज प्रमोशन किंवा पगारवाढीसारखी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. 

धनु: आज तुम्ही प्रलंबित कौटुंबिक कामे पूर्ण करण्यात व्यस्त असल्याने तुमच्या व्यवसायाकडे थोडं दुर्लक्ष कराल मात्र असे केल्यास नुकसान होऊ शकते. तसेच काही व्यावसायिक सौदे पुढे ढकलू शकतात यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित ज्या काही अडचणी येत होत्या त्या आज संपणार आहेत.व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. 

मकर: अचानक धन खर्चाची शक्यता आहे. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा. चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे कार्य करू नका. निरर्थक वाद-विवाद व चर्चा यापासून दूर राहा. शेअर बाजार किंवा लॉटरीत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमचे व्यावसायिक विरोधकही सक्रिय दिसतील. पण तुम्ही तुमच्या हुशारीचा वापर करून त्यांचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. 

कुंभ: आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण समाधानाचे राहील.परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीकडून महत्वाची बातमी ऐकायला मिळेल.मालमत्तेचा व्यवहार करत असाल तर सावधगिरी बाळगा. अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते.

मीन: आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात.आज तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायातील शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल त्यामुळे ते चिंतेत राहतील. आज तुम्ही तुमच्या मनातील एखादी गोष्ट कोणाशी शेअर केलीत तर ते तुमच्या भावनांचा फायदा घेऊ शकतात त्यामुळे सांभाळून रहा. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group