बिग बॉसच्या इतिहासातील 'ही' आहे सर्वांत महागडी स्पर्धक; 3 दिवसांचे घेतले तब्ब्ल २.५ कोटी रुपये
बिग बॉसच्या इतिहासातील 'ही' आहे सर्वांत महागडी स्पर्धक; 3 दिवसांचे घेतले तब्ब्ल २.५ कोटी रुपये
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : ‘बिग बॉस’चा हा एकोणिसावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षक देखील त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. स्पर्धेत कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना काही स्पर्धकांची नावंही चर्चेत आली आहेत. बिग बॉसच्या स्पर्धकांच्या मानधनाचा उल्लेख अनेकदा चाहत्यांमध्ये होत असतो. टेलिव्हिजनवरील हा सर्वांत लोकप्रिय शो असल्याने तसेच त्या त्या स्पर्धकाच्या लोकप्रियतेनुसार ही फी ठरवली जाते. ‘बिग बॉस’च्या इतिहासात अशाच एका स्पर्धकाने भरभक्कम मानधन स्वीकारलं होतं.

नाशिक : धोकादायक पूल, जीवघेणा मार्ग; तरुण थोडक्यात बचावले

सर्वाधिक मानधन घेणारी ही स्पर्धक ‘बिग बॉस’च्या चौथ्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. या सिझनचं विजेतेपद अभिनेत्री श्वेता तिवारीने पटकावलं होतं. हा सिझन अनेक कारणांमुळे खास ठरला होता. यामध्ये हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसनने एण्ट्री केली होती. विशेष म्हणजे ती बिग बॉसच्या घरात फक्त तीनच दिवस राहिली होती आणि त्यासाठी तिने निर्मात्यांकडून तब्बल 2.5 कोटी रुपये घेतले होते. मानधनाची ही रक्कम बिग बॉसच्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेपेक्षाही अधिक आहे. बिग बॉसच्या विजेत्याला 50 लाख रुपये मिळतात. काही सिझन्समध्ये ही रक्कम एक कोटी रुपये इतकीसुद्धा होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group