बिग बॉस १८ चा हा नवा सिझन सध्या प्रचंड चर्चेत आहे, पहिल्याच आठवड्यात बरेच वाद पाहायला मिळाले आहेत. शो सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत आणि तो टीआरपीच्या बाबतीत लहरी आहे. आता सध्या बिग बॉस घरामध्ये सध्याचा चर्चेचा विषय म्हणजेच बिग बॉस १८ चे स्पर्धक गुणरत्न सदावर्ते.
बिग बॉसच्या या सीझनची टॅग लाइन 'टाइम का तांडव' आहे. घरात आल्या आल्या स्पर्धकांचं एकमेकांशी वाद आणि भांडणं सुरु झाली आहेत. टीआरपीमध्ये हा शो कमालीचं काम करतोय. घरात नॉमिनेशनची प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी नॉमिनेशन टास्क देखील झालेत. ज्यात चाहत पांडे आणि विवियन डीसेना यांच्यात भांडण झालं. तर वकील गुणरत्न सदावर्ते यांचं असं रुप पाहायला मिळालं, जे पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं.
बिग बॉस 18 चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस बोलताना दिसत आहेत की मी अविनाश, करण आणि ईशाला एक विशेष अधिकार देणार आहे की ते तीन सदस्यांना निवडतील जे तुरुंगात बंद राहतील. त्यावर तिघांनी म्हणाला, गुणरत्न सदावर्ते यांचं नाव घेतलं आणि हे ऐकताच गुणरत्न सदावर्ते संतापले. त्यांनी तुरुंगात जाण्यास नकार दिला. त्यांनी म्हटलं की तुरुंगात जाण्यापेक्षा मी नॉमिनेट होणं योग्य समजेन.
इतकंच नाही तर गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसला धमकी दिली. जेव्हा बिग बॉस यांनी गुणरत्न सदावर्ते यांना सांगितलं की त्यांना तुरुंगात जावं लागेल. तर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, कोणीच मला तुरुंगात टाकू शकत नाही. मला सरकार घाबरते. दाऊद इब्राहिम घाबरतो. हे ऐकूण बिग बॉसही शांत झाले.
सोशल मीडियावर गुणरत्न सदावर्ते यांचं हे वक्तव्य व्हायरल झालं आहे. हे पाहून गुणरत्न यांच्या या वागणुकीव सलमान खानचं काय प्रतिक्रिया असणाऱ्या याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.