सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाची स्पष्ट प्रतिक्रिया,  म्हणाले.....
सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाची स्पष्ट प्रतिक्रिया, म्हणाले.....
img
Dipali Ghadwaje
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची आज सकाळी काही अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप होत आहे. अशातच आता याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

आज गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची जी तोडफोड करण्यात आली, याचं आम्ही समर्थन करत नाही, तसेच, ज्यांनी हल्ला केला ते आमचे कार्यकर्ते नाहीत, असं म्हणत मराठा क्रांती मोर्चानं त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळले आहेत. 


यासोबतच, गुणरत्न सदावर्ते कायम मराठा समाजाविषयी गरळ ओकत आलेत, त्यांनी किमान आता तरी शांत राहावं, असा सल्लाही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सदावर्तेंना देण्यात आला आहे. 

मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक, अमोल जाधवराव यांनी मराठा क्रांती मोर्चाची बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "आज सकाळी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, याचे आम्ही समर्थन करत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी तो हल्ला केला ते मराठा क्रांती मोर्चा मुंबईमधील नाहीत. जर ते तरुण मराठा तरुण असतील आणि त्यांनी भावनेच्या भरात केलेलं हे कृत्य असेल तर त्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. 

गुणरत्न सदावर्ते हे कायम मराठा समाजा विषयी गरळ ओकत आले आहेत. त्यांनी किमान आता तरी शांत राहावं. मराठा समाज आपल्या मागण्या या सरकारकडे मागत आहेत. तर सदावर्ते हे मराठा समाजाशी काही ही वाकडं नसताना कायम क्लेशवाचक वक्तव्य का करत आहेत? असा सवाल आमच्या मनात आहे."

तर दुसरीकडे सदावर्ते यांनी गाडीची तोडफोड प्रकरणासंदर्भात माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी जरांगे पाटील हेच दोषी आहेत, त्यांना अटक करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group