गेल्या ५ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालं असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं. तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलदगतीने निर्णय घेणार असल्याचंही उपसमितीने मान्य केलं. मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती. त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे, त्यासाठी एक-दोन महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसमितीने केली आहे.
सरकारकडून मनोज जरांगेंच्या या अटी मान्य
1) हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती. ही मागणी शासनानं मान्य केली.
2) गावातील, कुळातील आणि नात्यातील व्यक्तींना चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
3) सातार गॅझेटवर अभ्यास केला जाईल. जलद मान्यता मिळेल.
4) हैदराबाद गॅझेटचा जीआर तासाभरात देण्याची मागणी. रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करू- जरांगे पाटील.
5) मराठा आंदोलकांवरील आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार आहे.
6) मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केला असून, त्यावर जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू