''अन्यथा महायुतीला सरकार चालवणे अवघड ..'', नक्की काय म्हणाले मनोज जरांगे ?
''अन्यथा महायुतीला सरकार चालवणे अवघड ..'', नक्की काय म्हणाले मनोज जरांगे ?
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुतीचे सरकार आले असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.  त्यानंतर आता राजकीय वर्तुळातील घडामोडींचा वेग आलं आहे. दरम्यान आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी  मराठा आरक्षणावरून  राज्य सरकारला एक इशारा दिला आहे. 

5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा देत ते म्हणाले, आता जनतेचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. सरकारने 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात. जर पुन्हा एकदा मराठा समाज विरोधात गेला तर सत्ता चालवणे सुद्धा अवघड होईल, असा इशारा त्यांनी दिला.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलन दीड वर्षापासून सुरु आहे. परंतु मराठा समाजाला न्याय अजून मिळाला नाही. आता 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. काही महिन्यांपूर्नी मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ अंतरवाली आले होते. त्यावेळेस त्यांनी हे सगळे सांगितले होते. त्यामुळे आता 5 जानेवारीपर्यंत संधी दिली. त्यामुळे संधीचा सोने करा. अन्यथा मराठे पुन्हा आंदोलन सुरु करतील, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनाही विशेष करून सांगतो की आता तरी मराठा समाजाला असे वाटायला नको की तुम्ही समाजाचा द्वेष करता. त्यामुळे पुन्हा एकदा अंतरवालीमध्ये करोडोच्या संख्येने मराठा समाज येईल आणि हा संपूर्ण देश बघेल. मागील काही दिवसांत मला एकटा पाडून उघड पाडण्याचा प्रयत्न केला गेला. हे माझ्या समाजाला सहन होत नाही. आता असा प्रकार करु नये, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group