मुंबईत भगवं वादळ ! मनोज जरांगेंना कोणकोणत्या नेत्याने दिला पाठिंबा ? वाचा
मुंबईत भगवं वादळ ! मनोज जरांगेंना कोणकोणत्या नेत्याने दिला पाठिंबा ? वाचा
img
वैष्णवी सांगळे
मराठा आरक्षणासाठी आज मुंबईत तुफान गर्दी उसळली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  परिसरात मराठा बांधवांचा जनसागर उसळला आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली असून जयघोष आणि आक्रमक उत्साहाने वातावरण भारावून गेल्याचे पाहायला मिळत आहे. 

जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम असून आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधव मुंबईकडे जमा झाले असून मंत्रालय परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. याच आंदोलनाला राज्यातील कोणकोणत्या नेत्यांचा पाठिंबा आहे, जाणून घ्या 

नाशिक : वकिलाच्या घरातून 23 तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी ; परिसरात खळबळ

'या' नेत्यांकडून मिळाला पाठिंबा 
आमदार रोहित पवार -  कर्जत-जामखेड येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार रोहित पवार 

खासदार कल्याण काळे - जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे 

आमदार सरोज अहिरे - देवळाली येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार सरोज अहिरे 

आमदार उत्तम जानकर - राष्ट्रवादी शरदपवार गटाचे आमदार उत्तम जानकर माळशिरस

आमदार विजयसिंह पंडित - गेवराई येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार विजयसिंह पंडित 

...तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक

आमदार बाबासाहेब देशमुख - सांगोला, शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख 

आमदार नारायणआबा पाटील - करमाळ्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नारायणआबा पाटील 

आमदार अभिजीत पाटील - माढा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील 

आमदार प्रकाश सोळंके - माजलगाव येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार प्रकाश सोळंके 

आमदार राजेश विटेकर - पाथरी येथील राष्ट्रवादी गटाचे आमदारराजेश विटेकर 

आमदार राजू नवघरे - वसमत येथील राष्ट्रवादी गटाचे आमदार राजू नवघरे 

इतर बातम्या
Join Whatsapp Group