...तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक
...तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक
img
वैष्णवी सांगळे
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले. मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतूकीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईतील अनेक भागात वाहतूककोंडी झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी आंदोलनाला परवानगी दिल्यामुळे सरकारचे आभार मानताना मनोज जरांगे पाटील दिसले. मात्र, यासोबतच त्यांनी थेट मोठा इशारा दिला आहे. आम्हाला आमरण उपोषणाची करण्याची परवानगी द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केले. 'सरकारने सहकार्य केले आणि आपणही त्यांना सहकार्य करू. कुणीही जाळपोळ आणि दगडफेक करायची नाही. पोलिस बांधवांना सहकार्य करायचे.', असे सांगत मनोज जरांगे यांनी सर्वांना संयम ठेवण्यास सांगितला. 'आरक्षणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही.', असे देखील आवाहन मनोज जरांगेंनी सर्वांना केले.

मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावरून सांगितले की, 'माझ्या आमरण उपोषणाला १० वाजल्यापासून सुरूवात झाली. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलो आहोत. गडबड गोंधळ करू नका. आपण शिकलो नाही. आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्याला ७० वर्षे काही मिळाले नाही. आपला समजात कसा मोठा करता येईल, त्यासाठी आपल्याला आता पर्यंत्न करायचे आहेत.'
इतर बातम्या
Join Whatsapp Group