ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. २९ ऑगस्टला सुरु होणाऱ्या आंदोलनात आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्र त्यांनी घेतला आहे. मुंबईतील आझाद मैदानात उद्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. दरम्यान, आझाद मैदान येथे २९ तारखेला आंदोलनासाठी तीन संघटनांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदान येथे परवानगी दिली आहे.
यापूर्वी आझाद मैदान येथे 29 तारखेला आंदोलनासाठी ३ संघटनांकडून पोलिसांकडे परवानगी मागीतली होती. मात्र, पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं स्वरुप आणि होणारी गर्दी लक्षात घेता इतर संघटनांना परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी अटीशर्तींसह परवानगी दिली आहे.