परवानगी फक्त एक दिवसाची ! ... तर राजकीय करिअर बर्बाद करणारी लाट येईल, मनोज जरांगेचा इशारा
परवानगी फक्त एक दिवसाची ! ... तर राजकीय करिअर बर्बाद करणारी लाट येईल, मनोज जरांगेचा इशारा
img
वैष्णवी सांगळे
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. २९ ऑगस्टला सुरु होणाऱ्या आंदोलनात आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्र त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे मुंबई मोर्चासाठी केवळ एका दिवसाची परवानगी त्यांनी मिळाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरंगे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.

हे ही वाचा 
हृदयद्रावक ! काळरात्र ठरली, इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मुंबईतील आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची परवानगी दिल्याबद्दल जरांगे पाटील म्हणाले, "सरकारला न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे करावे लागले हे अंतिम सत्य आहे. मात्र आंदोलनाला परवानगी देणे हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात होते, हे देखील समोर आलं आहे. त्यामुळे फक्त एक दिवसाची परवानगी देणे ही गरीब मराठा समाजाची चेष्टा आहे. 'मी परवानगी दिली, माझी काय चूक?' हे फडणवीसांना सिद्ध करायचे होते, पण यामुळे राज्यात काय संदेश गेला, तो सर्वांना कळला आहे."

हे ही वाचा 
आजचे राशिभविष्य ! २८ ऑगस्ट २०२५ , आजचा वार गुरुवार ; कोणाला मिळणार आर्थिक लाभ ? जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल !

जरांगे पाटील यांनी म्हटलं की, "देवेंद्र फडणवीस साहेबांनी गैरसमज दूर करावा. तुमची बहुमताची सत्ता मराठा समाजाशिवाय आलेली नाही. जर मराठ्यांची नाराजीची लाट आली, तर ती राजकीय करिअर बर्बाद करणारी असू शकते.' पुढे जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना नम्र विनंती केली की, "ही मराठा समाजाची मने जिंकण्याची तुमच्यासाठी एक सोन्याची संधी आहे. तुम्ही आरक्षण दिली तर आम्ही आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group