मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा 17 वर्षांनंतर निकाल : मुख्यमंत्री फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया ; म्हणाले...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा 17 वर्षांनंतर निकाल : मुख्यमंत्री फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया ; म्हणाले...
img
Dipali Ghadwaje
नाशिकच्या मालेगावमधील बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी विशेष एनआयने कोर्टाने निकाल दिला असून, सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षांनंतर निकाल लागला असून, कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर , सुधाकर द्विवेदी , सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी या सातही आरोपींना दोषमुक्त करण्यात आलीआहे.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले  देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. 'दहशतवाद ना कधी भगवा होता, ना आहे आणि ना राहणार,' (आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!) असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group