मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत गुणात्मक बदल होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत गुणात्मक बदल होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
img
Dipali Ghadwaje
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सचं लोकार्पण करण्यात आलं. आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य पुराव्याअभावी आरोपी सुटताना दिसतात, पण आता तसं होणार नाही. त्याच ठिकाणी या किटच्या माध्यमातून 100 टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष घटनास्थळी काढता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जवळपास 256 व्हॅन्स आम्ही तयार करणार आहोत, 21 व्हॅन्स सध्या रोलआऊट केलेल्या आहेत. सगळ्या व्हॅन्स रोलआऊट होऊन सगळीकडे उपलब्ध होतील,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

योग्य प्रकारची व्यवस्था करणं, त्याचं स्टोरेज करणं याचे काही नवीन नियम सुरू केले आहेत. त्या नियमाअंतर्गत महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, जिथे त्याला अनुकूल अशा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तयार केल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असणार आहे, तिथे साइंटिफिक ॲनालिस्ट आणि केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्स्पर्टचा दर्जा आहे, ज्यांचं सर्टिफिकेशन झालंय, ते या व्हॅनमध्ये उपस्थित असतील. क्राईम सीनवर जाऊन तो ताब्यात घेऊन, तेथील जो पुरावा, एव्हिडन्स असेल तो ते जमा करतील, त्यामध्ये ब्लड सॅम्पल, नार्कोटिक सॅम्पल, एखाद्या स्फोटाचे सॅम्पल असू शकतं.

त्या प्रत्येकाचं जागेवर टेस्टिंग करण्याचे किट उपलब्ध आहे. आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य पुराव्याअभावी आरोपी सुटताना दिसतात, पण आता तसं होणार नाही. त्याच ठिकाणी या किटच्या माध्यमातून 100 टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष घटनास्थळी काढता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वेगवेगळ्या इक्विपमेंटमधून जे पुरावे जमा होतील, जे स्टोअर करण्यासाठी ब्लॉकचेनची पद्धत तयार करण्यात आली आहे. कोर्टात अनेक दिवस केस सुरू असते, पण त्या वेळी लक्षात येत की जो पुरावा होता तो बदलला आहे, तो पुरावा टॅम्पर झाला आहे, पुराव्यात अडचणी आहेत. पण ब्लॉकचेन पद्धतीमुळे एखाद्या घटनेतील पुरावा कोणालाच टॅम्पर करता येणार नाही. त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा उपलब्ध असेल.

या सर्व व्हॅन्समध्ये सीसीटीव्ही तसेच फ्रीजही आहे. जेणेकरून एखादा पुरावा, इक्विपमेंट्स किंवा ॲनालिसीस करण्याची केमिकल्स यांचे योग्य टेम्परेचर मेंटेन करता येईल. सगळं योग्य प्रकारे सील होतंय की नाही त्यावर कॅमेऱ्यातून लक्ष ठेवता येईल. कुठेही एखाद्या आरोपीला पळवाट काढता येणार नाही.

एखाद्या रेपच्या केसमध्ये सीमेन कलेक्शन असेल , ब्लड सॅम्पल असेल किंवा डीएनए चाचणीसाठी साइंटिफिक कलेक्शन असेल तर असं कुठलंही कलेक्शन या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. गुन्हे उघडकीस येणं आणि त्या गुन्हेगारांना शिक्षा होणं या दोन्हीमध्ये गुणात्मक बदल आपल्याला पहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जवळपास 256 व्हॅन्स आम्ही तयार करणार आहोत, 21 व्हॅन्स सध्या रोलआऊट केलेल्या आहेत. सगळ्या व्हॅन्स रोलआऊट होऊन सगळीकडे उपलब्ध होतील,असे त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात अपराध सिद्धीचा तयार दर वाढवता येईल आणि अपराध्याच्या मनात भीती निर्माण करता येईल असेही ते म्हणाले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group