खळबळजनक ! भाजयुमो पदाधिकाऱ्यासह चुलत भावाचा खून, परिसरात खळबळ
खळबळजनक ! भाजयुमो पदाधिकाऱ्यासह चुलत भावाचा खून, परिसरात खळबळ
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील दोघा जणांची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी घडली. यापैकी प्रफुल्ल तांगडी ( वय ४२ ) असे मयत भाजप पदाधिकाऱ्याचे नाव असून दुसरा तरुण तेजस तांगडी ( २२ ) त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे.

भिवंडीत तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथील तांगडीच्या कार्यालयात ही घटना घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तांगडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रफुल्ल तांगडी दोन सहकाऱ्यांसोबत जे डी टी इंटरप्रायसेस या आपल्या कार्यालयात बसला होता. यावेळी रात्री ११ वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार आणि चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. 

हल्ल्यानंतर दोघं भाऊ जमिनीवर कोसळले, त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांची संख्या 4 ते 5 होती. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील एक धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे एक वर्षापूर्वीही प्रफुल्ल तांगडी यांच्यावर असाच जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते बचावले होते. मात्र, आजच्या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्यांचा जीव घेतला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group