महापालिकेचा रणसंग्राम ! उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात
महापालिकेचा रणसंग्राम ! उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात
img
वैष्णवी सांगळे
मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची गेल्या आठवड्यात घोषणा झाली. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच महापालिकेचा रणसंग्रामाला आजपासून सुरुवात झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून ३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 

अनेक ठिकाणी प्रमुख पक्षांची आघाडी किंवा युती याबाबत अद्याप घोषणा न झाल्याने स्पष्टता नसून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी किती उमेदवार अर्ज भरण्यासाठी येतात, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

दरम्यान , महानगरपालिकेसाठी मुंबई सोडून इतर ठिकाणी स्वबळावर लढण्याचा भाजपचा मनसुबा असून शुक्रवारी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर होणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवार अंतिम करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. त्यामध्ये उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे . ही यादी किमान 80 उमेदवारांची असेल असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.


mumbai | mnc |
इतर बातम्या
Join Whatsapp Group